मंगळुरु - कर्नाटकमधील मंगळुरु फूड डिलेव्हरी एक्झ्युकेटीव्ह आता दारोदारी फूड डिलेव्हरी करता करता पालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवणार आहे. मेघना दास असं या मुलीचं असून ती झोमॅटोसाठी फूड डिलेव्हरी एक्झ्युकेटीव्ह म्हणून काम करते. मेघनाला मंगळुरु शहर पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
मेघना मन्नागुड्डा वॉर्डमधून निवडणुक लढवणार आहे. याबाबत बोलताना मेघना यांनी सांगितले की, बंगळुरू येथून तिच्या करियरला सुरुवात केली आणि तेथे ती हेवलेटसाठी नोकरी करायची. नंतर ती नोकरीसाठी दुबईला गेली. काही दिवसांनी ती पुन्हा भारतात आली. जेव्हा ती भारतात पुन्हा आली त्यावेळी तिने नोकरी शोधण्यास प्रयत्न केले. त्यावेळी १५ हजारपेक्षा जास्त पगाराची नोकरी शोधणं अवघड झालं होत. म्हणून तिने झोमॅटोमध्ये फूड डिलेव्हरी एक्झ्युकेटीव्ह म्हणून नोकरीसाठी रुजू झाल्याने मेघनाने एएनआयशी बोलताना सांगितले.पुढे तिने सांगितले की, फूड डिलिव्हरीचे काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यावेळी तिला तिच्या मित्राने काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी नेले. फूड डिलेव्हरी करताना खराब रस्त्यांमुळे मी अनेकदा रस्त्यावर पडले. सुरक्षेच्या दृष्टीने याकडे लक्ष दिले पहिले असे गाऱ्हाणे तिने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला सांगितले. त्यावर या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर काँग्रेस नेत्याने मला पालिकेची निवडणूक लढविण्याबाबत विचारणा केली असल्याचे मेघनाने सांगितले. अखेरीस मला उमेदवारी मिळाली. देवाची कृपा झाली आणि मतदारराजाने मला पाठिंबा देऊन निवडणूक जिंकण्यास बळ दिले आहे. मी खराब रस्ते सुधारण्याकडे, महिलांची सुरक्षा, पाण्याची समस्या सोडविण्याचे प्रयत्न करेन. तसेच माझ्या वॉर्डात मी अनेक समस्या पहिल्या असून त्या समस्या मी सोडविणार असल्याचे मेघनाने सांगितले.