यूपीएच्या काळात सियाचिन आलं होतं संकटात?; तत्कालीन लष्करप्रमुखांनी सांगितली सत्यकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 06:01 PM2020-06-25T18:01:49+5:302020-06-25T18:13:18+5:30

२००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात देशासाठी सामरिकदृष्या महत्त्वाची असलेले सियाचिन ग्लेशियर संकटात सापडले होते, हा भाग काँग्रेस पाकिस्ताना सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे.

Was Siachen in crisis during the UPA era ?; The true story told by the then army chief | यूपीएच्या काळात सियाचिन आलं होतं संकटात?; तत्कालीन लष्करप्रमुखांनी सांगितली सत्यकथा

यूपीएच्या काळात सियाचिन आलं होतं संकटात?; तत्कालीन लष्करप्रमुखांनी सांगितली सत्यकथा

Next
ठळक मुद्देजगातील सर्वात उंचावरील रणभूमी असलेल्या सियाचिनमधून लष्कर हटवून त्याला शांतीपर्वत घोषित करण्याची यूपीएची योजना होती माझा या योजनेला तीव्र विरोध होता, असे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग यांनी सांगितलेसियाचिनचा भाग काँग्रेस पाकिस्तानला सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे.

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या देशात अस्वस्थतेचं वातावरण आहे. त्यातच चिनी घुसखोरीवरून राजधानी दिल्लीत आरोप प्रत्यारोपांनाही उत आला असून, गलवानमधील संघर्षावरून मोदी सरकारची कोंडी करणाऱ्या काँग्रेसला भाजपाकडून जुन्या घटनांचे दाखले देऊन प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच २००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात देशासाठी सामरिकदृष्या महत्त्वाची असलेले सियाचिन ग्लेशियर संकटात सापडले होते, हा भाग काँग्रेस पाकिस्तानला सुपूर्द करणार होता, असा गंभीर आरोप, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केल्याने खळबळ उडालेली आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

जगातील सर्वात उंचावरील रणभूमी असलेल्या सियाचिनमधून लष्कर हटवून त्याला शांतीपर्वत घोषित करण्याची यूपीएची योजना होती. मात्र माझा या योजनेला तीव्र विरोध होता, असे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग यांनी सांगितले. सर्वप्रथम सन १९८९ मध्ये सियाचिनला शांतीपर्वत घोषित करण्याची योजना आली होती, असेही त्यांनी सांगितले.

जनरल सिंग म्हणाले की, सियाचिनमधून लष्कर हटवण्याची चाचपणी १९८९ मध्येच सुरू झाली होती. त्यानंतर २००६ मध्ये असा प्रस्ताव समोर करून माझ्याकडे विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी मी लष्करप्रमुख होतो. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग त्यावेळी सियाचीनच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा हा पर्वत लष्कराच्या ताब्यात असणे गरजेचे असल्याची कल्पना मी त्यांना दिली होती. तसेच असे पाऊल उचलायचे असेल तर पाकिस्ताननेही त्यांचा लष्करी ताबा असलेल्या ठिकाणांचा खुलासा करावा, असे मी सांगितले मात्र पाकिस्तानने तसे करण्यास नकार दिला होता. त्यानंतर हा प्रस्ताव गुंडाळला गेला. 

दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर भाजपाने काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. लष्कराने विरोध केला नसता तर सियाचिन पाकिस्तानच्या ताब्यात गेला असता, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तसेच  नेहरू-गांधी-वाड्रा कुटुंबाला त्यातून काय फायदा झाला असता, असा गंभीर सवाल भाजपाने विचारला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

 

Web Title: Was Siachen in crisis during the UPA era ?; The true story told by the then army chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.