नवी दिल्ली - शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैयद वसीम रिझवी (Waseem Rizvi) यांनी असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना फटकारले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाल्यावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाष्य केले होते. याला रिझवी यांनी उत्तर दिले आहे. ओवेसींना काही त्रास असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे. मात्र, येथील मुसलमानांना शांततेत राहू द्यावे, असे रिझवी यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले वजीम रिझवी -वसीम रिझवी ओवेसींना (Waseem Rizvi Replied To Asaduddin Owaisi) म्हणाले, 'मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते. ज्यांचा अधिकार तुम्ही हिरावला होता, तो भारतीय संविधानाने त्यांना परत दिला आहे.' एवढेच नाही, तर रिझवी यांनी यावेळी ओवेसींना हिंदू-मुसलमानांचे रक्त वाहण्याचे राजकारण बंद करा, असा सल्लाही दिला. तसेच जिहादच्या नावावर मुसलमानांना भांडन करायला प्रवृत्त करू नका.
व्हिडिओ जारी करत दिलं उत्तर -रिझवी यांनी हिंदी भाषेतून एक व्हिडिओ जारी करत, अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करून ओवेसींना गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, आपण सर्व जण भारतीय संविधानाच्या नियमाने बांधले गेलो आहोत आणि सर्वोच्च न्यायालयानेच राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा केला आहे.
काय म्हणाले होते ओवेसी -अयोध्येतील भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. ओवेसी म्हणाले होते, नरेंद्र मोदींनी भूमिपूजनासाठी जायला नको होते. ते कुण्या एका धर्माचे पंतप्रधान नाहीत. एवढेच नाही, तर पंतप्रधानांनी 15 ऑगस्टची तुलना 5 ऑगस्टशी केली. पंतप्रधानांनी आज कुणावर विजय मिळवला, असे मी विचारू इच्छितो. हा स्वतंत्र्यासाठी लढलेल्या लोकांचा अपमान आहे, असेही ओवेसी म्हणाले होते.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डावरही निशाना -शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डावरही निशाणा साधला. ते म्हणाले, बोर्ड वाट बघतय, की 'ते भारतात पुन्हा एकदा बाबरी फौज तयार करतील आणि भारतात गृह युद्ध करवून हिंदुस्तानच्या संचालकावर पुन्हा कब्जा करतील.' ते म्हणाले, मनाला दिलासा देण्यासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा विचार चांगला आहे. पण मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने, असा विचार कसा केला, की भारतीय मुसलमान त्यांच्या मंसुब्यात त्यांची साथ देतील. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने भूमिपूजापूर्वी म्हटले होते, की बाबरी मशीद कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. हागिया सोफिया याचे चांगले उदाहरण आहे. मशिदीत मूर्ती ठेवल्याने, पूजा-पाठ सुरू केल्याने अथवा दीर्घकाळ नमाजवर प्रतिबंध घातल्याने मशिदीचा दर्जा संपत नाही.
महत्त्वाच्या बातम्या -
Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!
मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - "मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही"
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...