शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

'रस्ते बनवण्यासाठी कचऱ्याचा वापर; देश प्रदूषणमुक्त होणार', नितीन गडकरींची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 7:39 PM

Nitin Gadkari Interview: 'लवकरच धोरण आणले जाईल, स्वच्छ भारत अभियानालाही चालना मिळेल.'

Nitin Gadkari Exclusive: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचा वेग सर्वांनाच माहित आहे. भाजप सत्तेत आल्यापासून गडकरींच्या मंत्रालयाने अनेक महामार्गांची निर्मिती केली आहे. मेट्रो सिटीपासून ते अतिशय मागास भागांमध्येही गडकरींनी रस्ते बांधले आहेत. दरम्यान, देशाला प्रदुषण आणि कचरामुक्त करण्यासाठी गडकरींनी एक मोठी योजना आखली आहे.

ABP न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत गडकरींनी 'ग्रीन एक्स्प्रेस वे' प्रकल्पाची माहिती दिली. नितीन गडकरींनी शुक्रवारी (15 सप्टेंबर) सांगितले की, देशात अमेरिकन तंत्रज्ञानावर काम केले जात आहे. याअंतर्गत देशातील महामार्गांच्या निर्मितीत कचऱ्याचा वापर केला जातोय. कचऱ्यापासून रस्ते निर्मितीला 'ग्रीन एक्स्प्रेस वे' प्रकल्प म्हटले जात आहे.

‘गांधी जयंतीनिमित्त धोरण आणणार’ते पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत आम्ही गाझीपूरच्या कचऱ्याच्या डोंगरातून दिल्लीत अनेक रस्ते बनवले आहेत. या प्रकल्पामुळे देश कचरामुक्त होण्यात महत होईल. अहमदाबादमध्ये रस्ता तयार करतानाही 25 ते 30 टन कचरा वापरल्याची माहिती त्यांनी दिली. हा कचरा अहमदाबादच्या लँडफिल साइटचा होता. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त याबाबत धोरण आणत आहोत. यामुळे आपल्या स्वच्छ भारत अभियानाला चालना मिळेल, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.

G-20 मधून देशाला कोणते फायदे G-20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल? यावर केंद्रीय परिवहन मंत्री म्हणाले की, आपला देश पेट्रोल, डिझेल आणि गॅस इतर देशांकडून मोठ्या प्रमाणावर घेतो. पेट्रोल आणि डिझेलच्या वापरामुळेही प्रदूषण होत आहे. G-20 शिखर परिषदेदरम्यान, आम्ही ग्लोबल बायोफ्यूल्स अलायन्सची घोषणा केली आहे. जैवइंधनामध्ये इथेनॉलचाही समावेश आहे, जे आपले शेतकरी तयार करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर काय म्हणालेपेट्रोल-डिझेल वाहनांवर ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांवर खूपच कमी जीएसटी आहे. सरकार आले तेव्हा देशात 48 टक्के डिझेल कार विकल्या जात होत्या, आता हा आकडा 18 टक्क्यांवर आला आहे. डिझेल खूप धोकादायक आहे. लोकांना इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक फायदा होईल, म्हणून ते त्याकडे वळत आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीCentral Governmentकेंद्र सरकारhighwayमहामार्गGarbage Disposal Issueकचरा प्रश्न