टेंभुर्णी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभाग सोलापूर व ग्रामपंचायत टेंभुर्णी यांच्या संयुक्त सहकार्यातून १ कोटी ८७ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणार्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कामाचे भूमिपूजन आ़ बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले़सोलापूर जिल्ातील पथदर्शक प्रकल्प म्हणून उभारण्यात येणार्या या प्रकल्पामुळे टेंभुर्णी परिसरातील सांडपाणी सध्या अस्तित्वात असलेल्या गटारी, भुयारी गटारी व ज्या ठिकाणी गटारी नाहीत त्या ठिकाणी गटारी बांधून आरसीसी पाईपच्या सहाय्याने एका विहिरीत जमा करून ते २़५ अश्वशक्तीच्या पंपाच्या सहाय्याने नव्याने बांधण्यात येणार्या मृदजैव पद्धतीच्या सांडपाणी प्रक्रियावरून शेतीसाठी उपयोगात आणले जाणार आहे़ या प्रकल्पासाठी आय़आय़टी़पवई येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे़ ही योजना पूर्ण करण्यासाठी नाबार्डने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागास १ कोटी ८७ लाख ६३ हजार एवढा निधी मंजूर केला असून, हा प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे़यावेळी आ़बबनदादा शिंदे यंाच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार्या शुक्रवारपेठ, भुई गल्ली, रामोशी गल्ली येथील १७ लाख रूपये खर्चून बांधण्यात येणार्या भूमिगत गटारीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले़ यावेळी शिंदे साखर कारखान्याचे संचालक प्रभाकर कुटे, रमेश येवले-पाटील, सरपंच प्रतिनिधी बाळासाहेब महाडिक, उपसरपंच प्रमोद कुटे, डी़के़देशमुख, बंकट देशमुख, ग्रामपंचायत सदस्य योगेश बोबडे, सोमनाथ कदम, कैलास सातपुते, प्रदीप कांबळे, वैभव कुटे, राहुल आरडे, रोहित आरडे, अशोक मिस्कीन, ग्रामसेवक मधुकर माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़
सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कामांचे भूमिपूजन
By admin | Published: June 18, 2015 1:39 PM