शिमलाः गेल्या आठवड्याभरापासून हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते वाहून जाण्यासारखे प्रकार घडले आहेत. हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील ड्रेकरी भागात 22 ऑगस्ट रोजी रस्ता वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ड्रेकरी या भागातला रस्ता मध्येच वाहून गेल्यानं मोठा खड्डा पडला असून, वाहन चालकांनीही त्याच रस्त्यावरून पलिकडे जाण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.काही वाहन चालकांनी वाहून गेलेल्या दोन्ही रस्त्यांना जोडण्यासाठी लोखंडाचे पाईप टाकले असून, या लोखंडाच्या पाइपावरूनच कार दामटताना हे वाहन चालक दिसत आहेत. 28 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये वाहन चालक जीवाशी खेळ करून कशा प्रकारे वाहन लोखंडाच्या पाइपावरून पलिकडे नेत आहेत हे पाहायला मिळत आहे.
VIDEO- थरारक! ...अन् वाहून गेलेल्या रस्त्यावर लोखंडी पाइप टाकून त्यानं चालवली गाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 3:55 PM