नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटपटू विराट कोहलीने दिलेलले फिटनेस चॅलेंज दिले पूर्ण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत चॅलेंज पूर्ण केले आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं ‘फिटनेस चॅलेंज’ स्वीकारतानाच पंतप्रधान नरेंद मोदी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अनुष्का शर्मा यांना टॅग करुन आव्हान दिले होते. विराट कोहलीने दिलेले हे आव्हान मोदींनीही स्वीकारले होते. आज त्यांनी व्हिडीओ अपलोड केला आहे. व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारची योगासने करताना दिसत आहेत. मॉर्निग एक्सरसाइजचा व्हिडीओ अपलोड करत आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या ट्रॅकवरून मी दररोज सकाळी चालतो. त्यामुळे खूपच ताजेतवाने आणि उत्साही वाटते, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एका ट्विटमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि मनिका बत्राला फिटनेस चॅलेंज दिले आहे.
असे सुरु झाले फिटनेस चॅलेंज22 मे रोजी राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेसचं महत्व पटवून देण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाची मदत घेतली. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यायाम करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा फिटनेस मंत्र देत राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विराट कोहली, सायना नेहवाल आणि ह्रतिक रोशनलाही या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केलं होते. तेव्हापासून सोशल मीडियावर ‘फिटनेस चॅलेंज’ हे ट्रेंडमध्ये आहे.