ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - आरक्षणाच्या मागणीसाठी हरयाणात सुरु असलेल्या जाट आंदोलनामुळे दिल्लीत पाणी संकट निर्माण झाले आहे. दिल्लीत आता पाणी शिल्लक राहिले नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी जाहीर केले.
पाणी संकटामुळे सोमवारी दिल्लीतील शाळा बंद रहाणार असून, परिक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दिल्लीला हरयाणातील मुनाक कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र जाट समाजाच्या आंदोलनामुळे मागच्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे दिल्लीत पाणी संकट निर्माण झाले आहे.
मुनाक कालव्यातून पाणी सोडण्याची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि हरयाणाच्या मंत्र्यांबरोबर चर्चा सुरु असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्याचे आपण आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्या पाणी संकट लक्षात घेऊन दिल्ली सरकारने शनिवारी रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.