व्हॉल्व्ह गळतीकडे मनपाचे तीन महिन्यांपासून दुर्लक्ष तक्रार : मेहरूणमध्ये पाण्याची नासाडी
By admin | Published: April 19, 2016 11:22 PM
जळगाव: मेहरूणमधील रमाबाई आंबेडकर मराठी शाळेसमोरील व्हॉल्व्हला लागलेली गळती मनपाकडे तक्रार करूनही गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे.
जळगाव: मेहरूणमधील रमाबाई आंबेडकर मराठी शाळेसमोरील व्हॉल्व्हला लागलेली गळती मनपाकडे तक्रार करूनही गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे.महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना जळगाव शहरात वाघूरमधील पाणीसाठ्यामुळे पाणीटंचाई जाणवलेली नाही. मात्र पाण्याची नासाडी रोखणे आवश्यक आहे. मात्र मनपा पाणीपुरवठा विभाग त्याबाबत ढीम्म असल्याचे चित्र आहे. मेहरूणमधील रमाबाई आंबेडकर मराठी शाळेसमोरील पाईपलाईनवरील व्हॉल्व्हला गेल्या तीन महिन्यांपासून गळती लागली आहे. पाणीपुरवठा सुरू असताना तेथे हजारो लीटर पाण्याची नासाडी होते. त्यामुळे मनपाने हा व्हॉल्व्ह दुरुस्त करावा, अशी तक्रार राष्ट्रवादीचे सलीम इनामदार यांनी मनपा पाणीपुरवठा विभागाकडे केली. मात्र पाणीपुरवठा विभागातील समन्वयाअभावी गेल्या तीन महिन्यात ही दुरुस्ती होऊ शकलेली नाही. त्यामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी सुरूच आहे.