हेल्पलाइनवर पाणी गळतीच्या तक्रारींचा ओघ सुरूच गळतीमुळे मोठयाप्रमाणात पाण्याची नासाडी :
By admin | Published: September 07, 2015 11:27 PM
पुणे : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर पाणीकपात, गैरवापर करणार्यांवर दंडात्मक कारवाई आदी उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी गळती व गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास माहिती देण्यासाठी पालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत. सोमवारपर्यंत ९४ तक्रारींची नोंद झालेली आहे.
पुणे : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर पाणीकपात, गैरवापर करणार्यांवर दंडात्मक कारवाई आदी उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी गळती व गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास माहिती देण्यासाठी पालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत. सोमवारपर्यंत ९४ तक्रारींची नोंद झालेली आहे.पाणी गळती होत असल्याचे तसेच गैरवापर होत असल्याची तक्रार ०२०-२५५०१३८३/२५५०१३८६ या क्रमांकावर करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या ४ दिवसांपासून नागरिकांकडून अनेक तक्रार नोंदविल्या जात आहेत. पाणी गळतीच्या तक्रारी मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये कोथरुड, कर्वेनगर, वारजे, धनकवडी, बालाजीनगर, अप्पर इंदिरानगर, भारती विद्यापीठ परिसरातून नोंदविल्या जात आहेत. त्याचबरोबर अनधिकृत नळ कनेक्शन घेतल्याच्या, वॉशिंग सेंटरमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्याच्या, बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर सुरू असल्याच्याही तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनुसार तातडीने पाणीगळती रोखण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयामध्ये हेल्पलाइनवर तक्रार आल्यानंतर ती रजिस्टरमध्ये नोंदवून घेतली जाते. त्यानंतर लगेच संबंधित क्षेत्रिय कार्यालयामध्ये फोन करून भरारी पथक पाठविण्याची सुचना केली जाते. हेल्पलाइनवरून आलेल्या तक्रारी नुसार भरारी पथकांकडून कारवाई केली जात आहे. पाण्याचा गैरवापर होताचे आढळून आल्यास नागरिकांकडून दंड वसूल करण्याबरोबरच त्यांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी गळती होत असल्याचे आढळून आल्यास अधिकारी व कर्मचार्यांवर काय कारवाई करणार अशी विचारणा केली जात आहे.चौकटभरारी पथकांकडून कारवाईच नाहीआयुक्त कुणाल कुमार यांनी पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करून कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास, रस्त्यावर पाणी सांडले जात असल्यास, वॉशिंग सेंटर सुरू असल्यास कोणत्या अधिकार्यांनी देखरेख ठेवायची याच्याही सुचना केल्या आहेत. मात्र अद्याप या भरारी पथकांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.