वाघूरमध्ये शहराला ३ वर्ष पुरेल इतका पाणीसाठा
By admin | Published: May 06, 2016 10:11 PM
जळगाव : वाघूर धरणात अद्यापही शहराला आणखी तीन वर्ष पुरू शकेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीय पाणीटंचाईच्या संकटापासून मुक्त आहेत.
जळगाव : वाघूर धरणात अद्यापही शहराला आणखी तीन वर्ष पुरू शकेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीय पाणीटंचाईच्या संकटापासून मुक्त आहेत. वाघूर धरणाची उंची २३४.१० मीटर असून त्यात सध्या २३०.४५० मीटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या ५५ टक्के (२१२.८२९ दलघमी) पाणीसाठा आहे. त्यापैकी जिवंत पाणीसाठा १३६ दलघमी आहे. मनपाला वर्षभरात ४० दलघमी पाणीसाठा लागतो. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आहे त्या स्थितीत शहराला आणखी तीन वर्ष पुरू शकतो, अशी स्थिती आहे.