नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो पाहिल्यानंतर नव्हे, तर यामागची वस्तुस्थिती समजल्यावर तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा आहे एक भिकारी. त्याचे नाव आहे कौसर. अपघातात एक हात गमावल्यानंर त्याने आयुष्यात नोकरीशिवाय बरेच काही गमावले. पण, मुलीच्या स्वप्नांसाठी तो धडपडत आहे. मुलीला नवीन फ्रॉक घेण्यासाठी तो एकदा दुकानात गेला. पण, दुकानदाराने अपमानित करुन बाहेर पाठविले. आपली मुलगी खूप शिकावी, मोठी व्हावी असे स्वप्न डोळ्यांत घेऊन आणि आपल्या दु:खावर पांघरून घालून तो जगत आहे. फ्रॉक न मिळाल्याने तो नाराज झाला. भिकारी असला म्हणून काय झाले. पण, तोही एका मुलीचा बाप आहे. त्याने दोन वर्षे पैसे साठवून अखेर पिवळ्या रंंगाचा एक फ्रॉक खरेदी केला. बागेत जाताना शेजारच्या व्यक्तीचा मोबाइल सोबत घेतला आणि मुलीचा असा फोटो काढला. एका फोटोग्राफरने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. आपल्या मुलीने नवा फ्रॉक परिधान केल्याचा केवढा आनंद झाला त्याला. आपण राजा आणि मुलगी राजकुमारी असल्याचे भासत आहे, असे त्याने सांगितले.
तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
By admin | Published: April 15, 2017 1:24 AM