पिंपरी : किरकोळ कारणावरून सोमवारी पिंपरी रेल्वेस्थानकावर नागरिकांनी ‘रेल रोको’ आंदोलन केले. त्यामुळे तब्बल तीन तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पोलिसांनी जमाव पांगविल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत झाली.सकाळी अकराच्या सुमारास पिंपरी कॅम्पमधील साई चौकात काही नागरिक एकत्रित आले. किरकोळ कारणावरून त्यांनी पिंपरी स्थानकावरील लोहमार्गावर येत लोणावळ्याहून पुण्याकडे जाणारी लोकल सव्वा बाराच्या सुमारास रोखली. पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जाणारे रेल्वे इंजिनही अडविले. दोन्ही लोहमार्गांवरील वाहतूक अडविण्यात आली. हळूहळू जमाव वाढत गेला. त्यामुळे बंदोबस्तातही वाढ करण्यात आली. रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पोलिसांकडून नागरिकांना लोहमार्गावरून बाजूला होण्याचे आवाहन केले जात होते. मात्र, आंदोलक बाजूला होण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तणाव वाढतच गेला. शीघ्र कृती दलासही पाचारण करण्यात आले. दुपारी अडीचच्या सुमारास जमाव आक्रमक झाला. पोलिसांकडून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, जमाव शांत होण्याच्या स्थितीत नव्हता. अखेर, पोलिसांनी पुढे जाऊन जमाव हटविण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही जणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याने पोलिसांनी लाठीमार केला. (प्रतिनिधी)
पक्षांतराची लाट अन् दिग्गजांना नवख्यांचे आव्हान!
By admin | Published: October 07, 2014 5:15 AM