मयुरेश वाटवेवायनाड : केरळमधील सर्व २० लोकसभा जागांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रतिष्ठेच्या वायनाड मतदारसंघामधून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात सीपीआयच्या ॲनी राजा या निवडणूक लढवत आहेत. तिथे काँग्रेस किंवा सीपीआय भाजपविरोधात नव्हे तर इंडिया ब्लॉकमधील मित्र पक्ष एकमेकांवरच गरळ ओकत आहेत.
सीपीआयने ॲनी राजा यांच्या रूपाने तुल्यबळ चेहरा दिला आहे तर भाजपने प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. सीपीआय म्हणते मतदारसंघाला गरज असते तेव्हा राहुल गांधी गायब असतात. सीपीआय काँग्रेसच्या सीएएवरील मौनावरही टीका करते तर कन्नूर स्फोटांत सीपीआयचा हात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
राहुल गांधी यांची आश्वासनेशेतकऱ्यांच्या पिकाला आधारभूत किमतीचे कायदेशीर वचनस्टार्टअपसाठी ५,००० कोटींचा फंड३० लाख सरकारी नोकरभरतीगरीब महिलांच्या खात्यात दरवर्षी थेट १ लाख जमा करणारी महालक्ष्मी गॅरंटी योजनाकेंद्रीय नोकऱ्यांत महिलांना ५० टक्के आरक्षण
२०१९ मध्ये काय घडले?
राहुल गांधीकाॅंग्रेस (विजयी)७,०६,३६७
पी. पी. सुनीलसीपीआय२,७४,५९७