नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा विधेयकाची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत विधेयकाची अग्निपरीक्षा सुरू आहे. शिवसेना आणि जेडीयूनं या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेनेनं भूमिकेत अचानक बदल केला असून, जोपर्यंत विधेयकासंदर्भात आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचं निरसन होत नाही, तोपर्यंत विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. काँग्रेसच्या दबावामुळेच शिवसेनेनं भूमिकेत बदल केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आलेला आहे.राज्यसभेत हे विधेयक मांडले असता, शिवसेनेच्या संजय राऊतांनी या विधेयकावर भाष्य केलं आहे. हिंदुत्वावरून शिवसेनेला करण्यात येत असलेल्या लक्ष्यावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
Citizen Amendment Bill : तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर; संजय राऊतांचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 3:57 PM