कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता थोडे दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना चांगलाच वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपने संकल्पपत्र म्हणत जाहीरनामा जाहीर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी मेदिनीपूर येथे रोड शो केला. ममता बॅनर्जी यांनी आपला मेडिकर रिपोर्ट सार्वजनिक करावा, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, बंगालमध्ये भाजपाच विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला. (west bengal assembly election 2021 bjp leader amit shah demands that mamata banerjee public her medical report)
पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथील रोड शो दरम्यान एका वाहिनीशी बोलताना अमित शाह यांनी ही मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, बंगाली जनतेच्या इच्छेनुसारच संकल्पपत्र तयार करण्यात आले आहे. भाजपचे संकल्पपत्र संपूर्ण देशात गांभीर्याने घेतले जाते. सोनार बांगलाची संकल्पना घेऊनच आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत, असे अमित शाह यांनी नमूद केले. तसेच, दै. जागरणला दिलेल्या मुलाखतीत भाजपाकडून धार्मिक धुव्रीकरण होत असल्याच्या आरोपासंदर्भात अमित शहा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना जनेतच्या मनातील प्रश्न उठवणे म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण असेल तर धार्मिक ध्रुवीकरणाची ही नवीन व्याख्या ऐकतोय, असे शहा यांनी म्हटले.
आम्ही म्हणतो बंगालमध्ये दुर्गा पूजा बॅरोकटोक पद्धतीने व्हायला हवी, त्यामध्ये कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही. मग, तुम्ही ही पूजा का थांबवली? हे धार्मिक ध्रुवीकरण नाही का?. आम्ही म्हणतो की, सरस्वती पूजा व्हायला पाहिजे, पण तुम्ही तीही का थांबवली? मग हे ध्रुवीकरण नव्हते का?, असा उलट प्रश्न अमित शहा यांना उपस्थित केला. कुणी रमजान साजरा करावा, आमचा विरोध नाही. कुणी ख्रिसमस साजरा करावा, आमचा विरोध नाही. मात्र, दूर्गा पूजा आणि सरस्वती पूजेवरही बंधनं घालता कामा नये, या पूजाही व्हायलाच हव्या, अशा शब्दात धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रश्नावर अमित शहांनी आपली बाजू स्पष्ट केली. टीएमसीच्या कार्यकर्त्यांवर हिंसा करत असल्याचा आरोप होत आहे, याला कसं उत्तर द्याल असा प्रश्न अमित शहा यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना, जेव्हा एखाद्या राज्यात सरकार बदलणार असते, तेव्हा सर्वात आधी गुंड आणि पोलिसांना त्यांचा अंदाज येतो. त्यामुळे, जेव्हा सरकार बदलणार असते, तेव्हा कोणीही येणाऱ्या सरकारविरुद्ध हिंसात्मक पाऊल उचलत नाही. म्हणूनच, तुम्ही पहा सर्वकाही शांत रितीने सुरू असून ही निवडणूकही शांत पद्धतीनेच होत आहे, असे अमित शहा यांनी म्हटले.