नवी दिल्ली - विरोधकांच्या प्रचंड गोंधळाला झुगारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आपल्या सरकारील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर राज्यसभेतही विरोधकांचा समाचार घेताना मोदींनी आपले सरकार हे नेम चेंजर नसून एम चेंजर असल्याचे म्हटले आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधीपक्ष नेेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकार हे गेम चेंजर नव्हे तर नेम चेंजर असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले, " तुम्ही म्हणालात, आम्ही गेम चेंजर नाही नेम चेंजर आहोत, पण तुम्ही आमच्या कार्यपद्धतीकड लक्ष दिले असते तर तुम्हाला आम्ही एम चेंजर असल्याचे जाणवले असते. देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आम्ही आराखडा तयार ठेवला आहे." यावेळी आपल्यावर आणि भाजपावर होत असलेल्या टीकेचाही मोदींनी समाचार घेतला. तुम्ही भाजपावर टीका करता करता भारतावर टीका करू लागता. मोदींवर हल्लाबोल करता करता हिंदुस्थानवर हल्लाबोल करू लागता, असे मोदी म्हणाले. त्याआधी बुधवारी सकाळी लोकसभेमध्येही विरोधकांवर जोरदार टीका केली होती. चिखल फेका आणी पळून जावा अशी आताच्या राजकारणी लोकांची स्थिती आहे. पण तुम्ही आमच्यावर जेवढा चिखल फेकाल तेवढं कमळ फुलेल असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगवला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत उत्तर देत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना खडे बोल सुनावले. मोदींचे तब्बल दीड तास भाषण झाले त्यावेळी विरोधकांची घोषणाबाजी सुरुच होती. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी देखील तितक्याच जोशात आपलं भाषण पूर्ण केलं. यावेळी ते म्हणाले की, 'देशाला लोकशाही काँग्रेसनं किंवा नेहरुंनी दिलेली नाही. लोकशाही ही आमच्या रक्तात आहे, आमची परंपरा आहे. तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारता? तुमचे पंतप्रधान राजीव गांधींनी हैदराबाद विमानतळावर आपल्याच पक्षाच्या दलित मुख्यमंत्र्यांना सर्वांसमोर अपमानित केलं होतं', ही आठवण नरेंद्र मोदींनी काँग्रेसला करुन दिली. 'आम्हाला तुम्ही लोकशाही शिकवू नका. तुम्हाला ते शोभून दिसत नाही. सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, त संपूर्ण काश्मीर आपलं असतं. आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेल्या अनेक देशांनी प्रगती केली आहे हे मान्य करा', असं नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळी भारता डोकलाममध्ये युद्ध करत होता. त्यावेळी तुम्ही चीनच्या लोकांसोबत भेटण्यात व्यस्त होतात.