वरिष्ठ व्हायरोलॉजिस्ट डॉ. शाहिद जमील (Virologist Shahid Jameel) यांनी रविवारी भारतीय SARS-CoV-2 जिनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या वैज्ञानिक सल्लागार समुहाच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. शाहिद जमील हे केंद्र सरकारने तयार केलेल्या एका खास सल्लागार समितीचे सदस्य होते, त्यांच्यावर व्हायरस जिनोम स्ट्रक्चरची ओळख पटवण्याची जबाबदारी होती. यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "INSACOG नं मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला धोकादायक भारतीय म्यूटेंटबाबत माहिती दिली होती. परंतु सरकारनं यावर लक्ष दिलं नाही," असा आरोप ओवेसी यांनी केला आहे. ओवेसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर निशाणा साधला. "INSACOG जो एक सरकारी वैज्ञानिक सल्लागार समूह आहे, त्याचे अध्यक्ष एस. जमील यांनी आपला राजीनामा दिला आहे. INSACOG नं मार्च महिन्याच्या सुरूवातीला पंतप्रधान कार्यालयाला धोकादायक म्युटेंटबाबत इशारा दिला होता. परंतु सरकारनं यावर लक्षचं दिलं नाही. सरकारनं विज्ञानाला महत्त्व दिलं नाही असं जमील यांनी उघडपणे सांगिलं. आपण सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैज्ञानिक समजाची किंमत चुकवत आहोत," असं ओवेसी म्हणाले.
"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत," जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 1:38 PM
Senior virologist Shahid Jameel resigned: INSACOG नं मार्चच्या सुरूवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला भारतीय म्यूटेंटबद्दल सांगितल्याचा ओवेसींचा आरोप.
ठळक मुद्देINSACOG नं मार्चच्या सुरूवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला भारतीय म्यूटेंटबद्दल सांगितल्याचा ओवेसींचा आरोप.प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमील यांनी वैज्ञानिकांच्या सल्लागार समुहाचा दिला राजीनामा.