ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - आम्ही पासपोर्टचा रंग नाही, तर रक्ताची नाती पाहतो, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. बंगळुरुतील 14व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मोदींनी परदेशात जाणारे आणि राहणा-या भारतीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अनेक योजना जाहीर केल्या आहेत. भारतीय कामगारांना या योजनांचा फायदा होणार आहे. नोकरीचं आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एजंट्सचा उपद्व्याप वाढला आहे. अशांवर जलदगतीने कठोर कारवाई करणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. जगभरात जवळपास 30 दशलक्ष परदेशी भारतीय आहेत. त्यामुळे भारतीय वंशाच्या पीआयओ कार्डधारकांना ओसीआय कार्ड घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. ओसीआय कार्ड म्हणजेच ओव्हरसीज् सिटिझनशिप कार्डचा फायदा भारतातून स्थलांतर करत दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलेल्यांना होऊ शकतो. ही प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी भारतात आणि परदेशांमध्ये विशेष विभाग स्थापण्यात येणार आहेत. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रिया आणि कतारमध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीय वंशाच्या हजारो प्रवाशांना मी भेटलो आहे. त्या सर्व परदेशी नागरिकांना याचा फायदा होणार आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.
या कार्यक्रमात भारतीय वंशाचे जवळपास अनेक तरुण सहभागी झाले होते. उद्यापर्यंत हे संमेलन सुरू राहणार आहे. यावेळी भारत दौ-यावर आलेले पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे.
PM Modi with Samy Vellu (Malaysia’s Special Envoy on Infra)& Dr S Subramaniam (Malaysia's Health Min) at Pravasi Bhartiya Divas in Bengaluru pic.twitter.com/EgipCEnkvx— ANI (@ANI_news) 8 January 2017