Rahul Gandhi : "सरकार आक्रमण करतंय, शेतकऱ्यांना जीपखाली चिरडलं जातंय; त्यांची हत्या केली जातेय"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 11:32 AM2021-10-06T11:32:28+5:302021-10-06T11:42:43+5:30

Congress Rahul Gandhi And Lakhimpur Kheri Violence : राहुल गांधी यांनी भाष्य करत आपली भूमिका मांडली. तसेच मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

we dont care about manhandling we just care about farmers says rahul gandhi on lakhimpur | Rahul Gandhi : "सरकार आक्रमण करतंय, शेतकऱ्यांना जीपखाली चिरडलं जातंय; त्यांची हत्या केली जातेय"

Rahul Gandhi : "सरकार आक्रमण करतंय, शेतकऱ्यांना जीपखाली चिरडलं जातंय; त्यांची हत्या केली जातेय"

Next

नवी दिल्ली - लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे काही शेतकरी नेत्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली होती. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे पाचसदस्यीय शिष्टमंडळ आज लखीमपूरला भेट देणार आहेत. मात्र उत्तर प्रदेश सरकारने राहुल गांधी आणि शिष्टमंडळाला परवानगी नाकारली आहे. त्यावर राहुल गांधी यांनी भाष्य करत आपली भूमिका मांडली. तसेच मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जातंय, काल पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण ते लखीमपूर खिरी येथे गेले नाहीत" असं म्हणत निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी "काही दिवसांपासून देशातील शेतकऱ्यांवर सरकार आक्रमण करत आहे. शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. भाजपा नेत्याच्या मुलावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. दुसरीकडे पद्धतशीरपणे शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. काल पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण लखीमपूर खिरी येथे गेले नाहीत. दोन मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी लखीमपूर खिरी येथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे" असं म्हटलं आहे.

"आम्हाला मारलं, गाडलं तरी फरक पडत नाही आम्ही..."

"उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना मारलं जात आहे. त्यांच्या सरकारमधील आमदारानेही बलात्कार केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नव्या प्रकारचे राजकारण होत आहे. बलात्कार, शेतकऱ्यांना मारणे सुरू आहे. जे मारतात ते जेलच्या बाहेर असतात आणि जे मरतात ते आतमध्ये जातात" असं म्हणत राहुल गांधींनी टीकास्त्र सोडलं आहे. "आम्हाला मारलं, गाडलं तरी काही फरक पडत नाही... आमचं ट्रेनिंगचं तसं झालं आहे. हा शेतकऱ्यांच्या मुद्दा आहे. त्यामुळे मी लखनौला जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार" असल्याचं देखील राहुल गांधींनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"प्रियंका गांधींचं आंदोलन दडपण्यासाठीच फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप केलं बंद"

 प्रियंका गांधी यांचं आंदोलन दडपण्यासाठीच फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद करण्यात आल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. अगदी काँग्रेसच्या खासदारांपासून ते आपच्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच हा दावा केल्याचं आता पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. "असं दिसतंय की, जणू केंद्र सरकारने फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम जाणीवपूर्वक बंद केलं आहे. प्रियंका गांधीजींची चळवळ दडपली जाईल, यासाठी हे करण्यात आलं" असा दावा उदित राज यांनी केला आहे. तर, आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे. "भाजप मंत्र्याच्या दुष्कर्माचा व्हिडीओ आल्यापासून फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद झाले आहेत. भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो" असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. 


 

Web Title: we dont care about manhandling we just care about farmers says rahul gandhi on lakhimpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.