शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आम्हीच दाखविली जमीन, आकाश, अंतराळात सर्जिकल स्ट्राइकची हिंमत - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 4:45 AM

केंद्रातील एनडीए सरकारने जमीन, आकाश, अंतराळामध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत दाखविली, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.

मेरठ : केंद्रातील एनडीए सरकारने जमीन, आकाश, अंतराळामध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत दाखविली, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. आगामी लोकसभा निवडणुका म्हणजे आमचे निश्चयी सरकार व गतकाळातील गोंधळलेले राज्यकर्ते यांच्यातील सामना आहे, असेही ते म्हणाले.उपग्रहनाशक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा ‘मिशन शक्ती’ कार्यक्रम यशस्वी झाल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून भाजपाच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा प्रारंभ करताना ते बोलत होते. मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवातही मेरठमधूनच केली होती. ते तेव्हा आणि आजही म्हणाले की, १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्ध याच मेरठ शहरातून सुरू झाले होते. अन्यायाविरोधातील लढाई आपणही येथूनच सुरू करीत आहोत.प्रचारसभेच्या आधी त्यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना आदरांजली अर्पण केली. भारताच्या थोर सुपुत्रांपैैकी एक असलेल्या चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यायला तत्कालीन सरकारांना भाग पाडले होते, असेही मोदी म्हणाले. चौधरी चरणसिंह यांचे पुत्र व राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख अजित सिंह यांनी उत्तर प्रदेशमध्ये सपा व बसपाशी आघाडी केली आहे.मोदी म्हणाले की, एनडीएलाच पुन्हा केंद्रात सत्तेत आणायचे हे देशातील नागरिकांनी ठरविले आहे. भारताचा विकास झाला पाहिजे. शत्रूंपासून त्याचे संरक्षण झाले पाहिजे. कामे करणारे सरकार आमच्या रूपाने देशाने प्रथमच पाहिले. दमदार भाजपा व दागदार (कलंकित) विरोधक अशी लढाई या लोकसभा निवडणुकांत होणार आहे.काम जनतेने पाहिलेयएनडीए सरकारने कोणती कामगिरी केली हे प्रचारसभांमध्ये सांगणारच आहे. त्याचबरोबर गतकाळातसत्तेवर असणाऱ्यांना देशाची प्रगती का करता आली नाही, असा सवालही विचारणार आहे. आमच्या सरकारने केलेली उत्तम प्रगती जनतेने पाहिली आहे. दुसºया बाजूला दूरदृष्टी नसलेले विरोधकही देशाने बघितले आहेत, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक