ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 24 - सीआरपीएफ जवानांच्या ठिकाणाची आणि हालचालींची माहिती काही गावक-यांनी नक्षलवाद्यांना दिल्याचे सीआपीएफच्या एका जवानाने सांगितले.
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात काला पठारजवळ चिंतागुफा येथे नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 75 बटालियन जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले असून सात जवान जखमी झाले आहेत.
बुर्कापाल परिसरात नक्षलवाद्यांचे काही समर्थक असून ते सतत जवानांच्या ठिकाणांची आणि हालचालींची माहिती नक्षलवाद्यांना देत असल्याचा दावा सीआरपीएफचा जखमी जवान शेख मोहम्मद यांनी केला आहे. यावेळी शेख मोहम्मद म्हणाले की, बंडखोर महिलांच्या समुहासह 300 नक्षलवाद्यांनी आमच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यावेळी नक्षलवादी गावक-यांचा मानवी ढाल म्हणून वापर करत होते. काही गावकरी आमच्या ठिकाणाची आणि हालचालींची माहिती नक्षलवाद्यांना पाठवत होते. तसेच, सुरुवातीला नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला करत अंदाधुंद गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही सुद्धा गोळीबार केला. यात 12 हून अधिक नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. पण, यामध्ये आमचे सुद्धा मोठे नुकसान झाल्याचे, शेख मोहम्मद यांनी सांगितले.
They were around 300 & we were around 150, we kept firing. I shot 3-4 Naxals in the chest: CRPF constable Sher Mohammed injured in #Sukmapic.twitter.com/9LUK7ENRMX— ANI (@ANI_news) April 24, 2017