नवी दिल्ली : विविध ऊर्जा करारानुसार गुंतवणूकदारांना दिलेले आश्वासन आणि जबाबदाऱ्या भारत पूर्णपणे निभावण्यास वचनबद्ध आहे, विशेषत: नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील करारांबाबतची वचनबद्धता प्रामुख्याने पाळली जाईल, गुंतवणूकदारांनीचिंता करू नये, अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
‘सेराविक’च्या ‘इंडिया एनर्जी फोरम’मध्ये सीतारामन म्हणाल्या की, करारांचा सन्मान करीत आहोत.ज्यांनी भारताची ऊर्जा क्षमता वाढविण्यासाठी गुंतवणूक केलेली आहे त्यांनी याबाबत निश्चिंत रहावे. या क्षेत्रात येणारा काही काळ अनिश्चितता राहणार आहे पण वचनबद्धता पाळली जाईल, अशी ग्वाही मी त्यांना देते.
वीज खरेदी करार झालेल्या नूतनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या दरात कपात करण्याची मागणी आंध्र प्रदेश सरकारने अलीकडेच सौरऊर्जा महामंडळ व एनटीपीसी यांच्यांकडे केली आहे. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये आधीच गुंतवणूक करणाºया गुंतवणूकदार संस्थांना चिंता वाटते आहे.विजेचे दर कमी झाल्यास गुंतवणूक कशी भरून निघणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. त्यानुषंगाने निर्मला सीतारामन यांनी हे वक्तव्य केले आहे.वीजखरेदीबाबत साशंकतेचा परिणामउच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, वीज खरेदी करारांच्या पालनाबाबतशंका निर्माण झाल्यामुळे नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातीलगुंतवणूकदारांच्या धारणेवर परिणाम झाला आहे. नूतनीकरणीयऊर्जा क्षेत्रातून २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट भारताने निर्धारित केले आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांत भारताला मोठ्या गुंतवणुकीची गरज लागणार आहे.