पुडुच्चेरी : गेल्या विधानसभा निवडणुकांत द्रमुकला ८ जागा सोडल्या, पण त्यापैकी दोन ठिकाणीच विजय मिळाला. असे असताना त्या पक्षाला यंदा १३ जागा सोडण्यात आल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. आम्ही यंदा द्रमुकच्या उमेदवारांना पराभूत करू, असा इशाराच या कार्यकर्त्यांनी दिल्याने काँग्रेस नेते धास्तावले आहेत. त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोडही केली.
काँग्रेसने २०१६ साली २१ जागा लढवून १५ ठिकाणी विजय मिळवला होता. द्रमुकला अवघ्या दोन जागा मिळाल्या आणि भाकपला एक जागा दिली, पण तिथेही पराभव झाला. असे असताना काँग्रेसने आपल्या वाट्याच्या ५ जागा द्रमुकला देण्याचे कारणच काय, असा कार्यकर्त्यांचा सवाल आहे. द्रमुकला जागा सोडल्याने काँग्रेसच्या वाट्याला १५ जागाच आल्या आहेत.