शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
2
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
3
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
4
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
5
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
6
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
7
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
8
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
9
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
10
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
11
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
12
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
13
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
14
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
15
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
16
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
17
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
18
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
19
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
20
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."

आम्ही फाशी जाऊ, पण तुमचा अहंकार मोडून टाकू - लालूंचा केंद्र सरकारवर निशाणा

By admin | Published: July 07, 2017 8:29 PM

आम्ही फाशी जाऊ, पण तुमचा अहंकार मोडून टाकू अशी घणाघाती टीका लालू यांनी केंद्र सरकारवर केली

ऑनलाइन लोकमतपटना, दि. 7 - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा(सीबीआय)नं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर बेनामी अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईनंतर लालूप्रसाद यादव यांनी भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, बेनामी अ‍ॅक्टअंतर्गत झालेल्या कारवाईत सीबीआयचा दोष नाही, मोदी आणि अमित शहा यांचा दोष आहे. आम्ही फाशी जाऊ, पण तुमचा अहंकार मोडून टाकू असे ते म्हणाले. मोदी सरकार सर्व विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप यावेळी लालूंनी केला. यावेळी पत्रकार परिषदेत गोंधळ झाला. राबडी देवींची 10 तास तर तेजस्वीची 8 तास सीबीआयने चौकशी केल्याचं वृत्त खोटं असल्याचा खुलासा यावेळी लालूंनी केला. लालूंचे पुत्र तेजस्वी यादवने यावेळी आरएसएसवर निशाना साधला, ते म्हणाले, संघांच्या एजंटांना बिहारमध्ये प्रवेश नाही. बेनामी संपत्तीवर लालू म्हणाले, मी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नाही. 31 मे 2004 रोजी मी रेल्वे मंत्री बनलो, तर हॉटेलची 2003 मध्ये लीजवर देण्यात आली होती. 2006च्या रेल्वे कॅटरिंगच्या टेंडर प्रकरणात सीबीआयनं लालूप्रसाद यादवांसमवेत राबडी देवी, तेजस्वी यादव, सरला गुप्ता, आयआरसीटीसीचे तत्कालीन एमडी पी. के. गोयल, विजय कोचर, विनय कोचर यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लालू यांनी रेल्वेमंत्रिपदाच्या कार्यकाळात 32 कोटींची जमीन जवळपास 65 लाख रुपयांना विकली होती. तसेच या व्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या खासगी कंपन्यांना फायदा पोहोचवला होता. राबडीदेवी सरकारी नोकर नसताना त्यांच्यावर केस का दाखल केली? असा प्रश्न यावेळी लालूंनी उपस्थित केला.

आणखी वाचा

सीबीआयने लालू आणि अन्य आरोपींशी संबंधित असणा-या 12 ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केली. लालू रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून भारतीय रेल्वे कॅटरींग अँड टुरिजम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसीच्या माध्यमातून खासगी हॉटेल कंपन्यांना बेकायदा लाभ पोहोचवल्याचा आरोप आहे. लालू काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात 2004 ते 2009 दरम्यान देशाचे रेल्वेमंत्री होते. लालू प्रसाद यादव यांनी हॉटेल भाडेपट्टयावर देण्याच्या मोबदल्यात जमीन घेतली, असा आरोप सीबीआयने केला आहे. दरम्यान सीबीआयने एफआयआर नोंदवल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या पाटणा 10 सर्क्युलर रोड निवासस्थानी बंदोबस्तात वाढवण्यात आला आहे.