शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

'आम्ही नव्या पीढीला सांगतच राहणार, आपली बाबरी मशिद पाडली'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 2:25 PM

असुदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन आहे.

ठळक मुद्देइतिहासात सन 1949 मध्ये काय घडलं हे पाहायला हवं. ज्यावेळी मशिदीत गुप्तपणे मुर्ती ठेवण्यात आली होती. त्यानंतर, 1992 मध्ये मशिद पाडण्याची घटना घडली.

नवी दिल्ली - अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट भूमिपूजन होत आहे. या भूमीपूजनाच्या समारंभाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आयोजकांनी दिलेले नाही. अर्थात अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलाविण्यात आलेले नाही. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपवाद आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, हा प्रश्नच निकाली निघाला आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थितीच राज्यघटनेला धरुन नसल्याचा आरोप एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी केला आहे.

असुदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया आहे, असेही औवेसी म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अयोध्येतील सोहळ्याला जात आहेत, की वैयक्तिक हे त्यांनी स्पष्ट करावं, असा प्रश्नार्थक रोखही औवेसी यांनी बोलून दाखवला. आऊटलूक या वेबपोर्टला दिलेल्या मुलाखतीत औवेसी यांनी बाबरी मशिद आणि अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनसंदर्भात आपले मत व्यक्त केले. 

बाबरी मस्जीद ही मशिद असून ती कायम राहणार, ही माझी श्रद्धा असून त्यापासून मी किंवा इतर कुणीही पळ काढू शकत नाही. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडण्यात आली नाही, मी त्या निकालाचा विचार करत नाही. इतिहासात सन 1949 मध्ये काय घडलं हे पाहायला हवं. ज्यावेळी मशिदीत गुप्तपणे मुर्ती ठेवण्यात आली होती. त्यानंतर, 1992 मध्ये मशिद पाडण्याची घटना घडली. जोपर्यंत मुस्लीम आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोकं आहेत, तोपर्यंत आम्ही नव्या पिढीला सांगतच राहू की, आपली मस्जीद पाडलीय. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी, आम्ही आमच्या मार्गाने ते सांगणारचं, अशा शब्दात औवेसी यांनी बाबरी मस्जीद पाडल्याची घटना घडल्याचे सांगितले. 

 दरम्यान, अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला २०० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित असणार नाहीत, हे विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. अन्य वृत्तवाहिन्यांवरही तो पाहायला मिळेल. मात्र, केवळ दूरदर्शनचे कॅमेरामन व पत्रकार यांनाच तिथे हजर राहण्याची अनुमती आहे. अन्य पत्रकार व प्रसार माध्यमांना हजर राहता येणार नाही. 

टॅग्स :MosqueमशिदAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी