फरिदाबादमधील सराय येथील १२ तरुणींनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या एकच चर्चा सुरू आहे. या तरुणींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आता कधीही लग्न करणार नाहीत. लग्नापेक्षा स्वत:च्या पायावर उभं राहणं आणि समाजासाठी चांगलं काम करण्याची अधिक आवश्यकता आहे, असं या तरुणींचं मत आहे. या मुलींच्या गटामधील एक सदस्य असलेल्या मीनू गोयल हिने आम्ही एक समाजसेवा करत आहोत, असं सांगितलं.
मीनू गोयल हिने सांगितले की, मी आता कधीही विवाह करणार नाही. आम्ही १२ तरुणी एकत्र मिळून समाजासाठी काम करत आहोत. आम्हा सर्वांचं आपापलं काम आहे. तसेच आम्ही सर्वांनी खूप संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलो आहोत. मीनूने सांगितलं की, लग्न करणं हे इतकं महत्त्वाचं नाही. तर स्वत:च्या पायावर उभं राहणं आणि समाजाची सेवा करणं हे अधिक आवश्यक आहे. मीनू हिचं वय सध्या ३० वर्षे आहे. तसेच या वयात लग्न नाही तर समाजासाठी काम करणं महत्त्वाचं असल्याचं मत तिने मांडलं आहे.
मीनू गोयल हिच्या कुटुंबामध्ये चार बहिणी एक भाऊ आणि एक पुतण्या आहे. मीनू या सर्वांमधील तिसरं भावंड आहे. तिच्या दोन बहिणींचा आधीच विवाह झालेला आहे. मीनू सांगते की, आपल्या मुलांनी वेळेत लग्न करावं, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. मात्र आपलं लेकरू समाजासाठी काही तरी करत आहे, हे पाहतील, तेव्हा ते खूश होतील. मीनू हिने सांगितलं की, तिला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे. तसेच आपली मुलगी समाजासाठी काहीतरी करते आहे, याचा त्यांना अभिमान आहे.
मीनू सांगते की, त्यांना आता केवळ समाजासाठी काम करायचं आहे. त्यांचा उद्देश लोकांची मदत करणे आणि समाजामध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणणे हाच आहे. त्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती संघर्ष करते, तेव्हा समाज त्यांना खऱ्या उद्देशासह येऊन भेटतो. अशा प्रकारे मीनू आणि तिच्या सहकारी समाजासाठी प्रेरणा बनल्या आहेत.