शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
4
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
5
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
6
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
7
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
8
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
9
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
10
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
11
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
12
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
13
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
14
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
15
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
16
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
17
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
18
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
19
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
20
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

आम्ही वक्फ दुरुस्ती विधेयक आणू देणार नाही; भाजपचा मित्रपक्ष TDP ची विरोधी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 2:39 PM

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या टीडीपीने वक्फ विधेयकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Chandrababu Naidu TDP :चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचा मित्रपक्ष अशलेल्या टीडीपीने वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. दिल्लीत झालेल्या भारतीय संविधान सुरक्षा परिषदेत टीडीपीचे उपाध्यक्ष नवाब जान उर्फ ​​अमीर बाबू यांनी या विधेयकाला समर्थन नसल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले की, वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी आपल्याला पुढे जावे लागेल. हे भारताचे दुर्दैव आहे की, देशात 10-12 वर्षांत असे काही घडले आहे, जे व्हायला नको होते. आमचे नेते चंद्राबाबू नायडू हे धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहेत. ते हिंदू आणि मुस्लिमांकडे एकाच दृष्टिकोनातून पाहतात.

ते पुढे म्हणाले की, चंद्राबाबू नायडू यांच्यानुसार, बोर्ड ज्या धर्माचा आहे, त्याच धर्माचे लोक तिथे असले पाहिजेत. आम्ही हे वक्फ दुरुस्ती विधेयक आणू देणार नाही. चंद्राबाबू नायडू 15 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशमध्ये जमियतच्या मेळाव्यालाही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती टीडीपीचे उपाध्यक्ष नवाब जान यांनी दिली. दरम्यान, आता त्यांच्या या वक्तव्यामुळे देशातील राजकारण तापू शकते. 

मशिदी, दफनभूमी, मदरसे सर्व धोक्यात येतील - AIMPLBदुसरीकडे, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत मोठे विधान केले आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने वक्फ दुरुस्ती विधेयक अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. वक्फ कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मशिदी, दफनभूमी, मदरसे हे सर्व धोक्यात येईल, असे एआयएमपीएलबीने म्हटले आहे.

किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ विधेयक 2024 मांडलेदरम्यानस संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ विधेयक 2024 सादर केले होते. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याला विरोध केला. यानंतर सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी जगदंबिका पाल यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन केली. जेपीसीमध्ये लोकसभेतील 21 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयकावरील जेपीसीला आतापर्यंत ईमेलद्वारे 90 लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय सुमारे 70 ते 80 पेट्यांकडून लेखी सूचनाही आल्या आहेत. या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत जेपीसीच्या अनेक बैठका झाल्या पण हे प्रकरण सुटताना दिसत नाही.

हिवाळी अधिवेशनात वक्फ विधेयक मांडले जाईलJPC नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपला अहवाल तयार करेल आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडेल. याआधी वक्फवरील संयुक्त संसदीय समिती आठवड्यातून 5 राज्यांना भेटी देऊन संबंधितांशी बैठका घेणार आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 वर सार्वजनिक सल्लामसलत करण्यासाठी समितीची ही शेवटची भेट असेल. यामुळे 9 नोव्हेंबरपासून समितीचा आसाम दौरा सुरू होणार आहे. यानंतर ही समिती 11 नोव्हेंबरला ओडिशाचा दौरा करणार आहे. त्यानंतर कोलकाता, पाटणा आणि लखनौला भेट देतील.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीBJPभाजपा