तिरुवनंतपुरम - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, काँग्रेसकडूनराहुल गांधीवायनाड येथून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाल्यानंतर डाव्या पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे केरळमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांशी पुकारलेली थेट लढाई असून, येथे त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे डाव्या पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसचा हा निर्णय डाव्या पक्षांच्या नेत्यांना फारसा रुचलेला नाही. कांग्रेसने घेतलेला निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात लढण्यास दिेलेले असून, येथे त्यांचा पराभव करण्यासाठी पक्ष करेल, असे डाव्या पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने उचललेले हे पाऊल म्हणजे 2019 मध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठीच्या काँग्रेसच्या कटिबद्धतेविरुद्ध आहे, असे डाव्या पक्षांचे म्हणणे आहे. सीपीएमचे माजी महासचिव महासचिव प्रकाश करात यांनी सांगितले की, "वायनाड येथून राहुल गांधींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा काँग्रेसचा निर्णयाचा अर्थ आता केरळमध्ये डाव्यांविरोधात लढण्यालाच काँग्रेसचे प्राधान्य आहे, असा होतो. एकीकडे काँग्रेसवाले भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगतात. तर दुसरीकडे ते वायनाड येथून राहुल गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात.''
वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधात लढणार, त्यांना पराभूत करणार! डाव्या पक्षांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 1:59 PM