विमान नको, लोकांना भेटण्याचं स्वातंत्र्य द्या; राहुल गांधींचा सत्यपाल मलिक यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 01:07 PM2019-08-13T13:07:27+5:302019-08-13T13:08:10+5:30
राहुल यांनी काश्मीर खोऱ्याचा दौरा करावा. परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यासाठी आम्ही विशेष विमान पाठवतो, असं जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं होतं. त्यावर राहुल गांधींनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली - कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपावर टीकेचं लक्ष्य केलेलं असताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोला लगावला होता. विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीरची परिस्थिती पाहा असं आवाहन केलं होतं त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच आम्हाला विमानाची गरज भासणार नाही परंतु कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि तेथील लोक, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा असं प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना दिलं आहे.
Dear Governor Malik,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 13, 2019
A delegation of opposition leaders & I will take you up on your gracious invitation to visit J&K and Ladakh.
We won’t need an aircraft but please ensure us the freedom to travel & meet the people, mainstream leaders and our soldiers stationed over there. https://t.co/9VjQUmgu8u
राहुल यांनी काश्मीर खोऱ्याचा दौरा करावा. परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यासाठी आम्ही विशेष विमान पाठवतो, असं जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं होतं. त्यावर राहुल गांधींनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. त्याला मलिक यांनी प्रत्युतर दिलं होतं. सांप्रदायिक दृष्टीकोनातून कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. त्यामुळे मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. त्यामुळे अशा प्रकारची बेजबाबदार विधानं तुम्हाला शोभत नाहीत, असं मलिक म्हणाले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोदींनी पारदर्शकपणा दाखवून या प्रकरणी चिंता व्यक्त करायला हवी, अशी मागणी राहुल यांनी शनिवारी केली होती. कोणत्याही सांप्रदायिक दृष्टीकोनातून जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. कलम 35 ए आणि कलम 370 मधील बहुतांश तरतुदी सर्वांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. लेह, कारगिल, जम्मू, राजौरी, पूँछ असो वा काश्मीर या निर्णयामागे कोणताही सांप्रदायिक दृष्टीकोन नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला होता.