देशातील आमदारांची संपत्ती ७३,३४८ कोटी; कर्नाटकचे नेते सर्वांत श्रीमंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:57 IST2025-03-19T11:56:16+5:302025-03-19T11:57:43+5:30

अहवालानुसार, भाजपचे ३९, काँग्रेसचे ३०, टीडीपीचे २२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, शिवसेनेचे ३ आणि शरद पवार गटाचे २ आमदार अब्जाधीश आहेत. 

Wealth of MLAs in the country is 73,348 crores; Karnataka leaders are the richest | देशातील आमदारांची संपत्ती ७३,३४८ कोटी; कर्नाटकचे नेते सर्वांत श्रीमंत

देशातील आमदारांची संपत्ती ७३,३४८ कोटी; कर्नाटकचे नेते सर्वांत श्रीमंत

नवी दिल्ली : देशातील ४,०९५ आमदारांपैकी किमान ४५ टक्के आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. १,८६१ आमदारांनी आपल्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे. यातील १,२०५ आमदारांवर (२९ टक्के) गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, हे गुन्हे हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांचा छळ या संबंधातील आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने ४,१२३ आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून हा अहवाल दिला आहे.

अहवालानुसार, भाजपचे ३९, काँग्रेसचे ३०, टीडीपीचे २२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, शिवसेनेचे ३ आणि शरद पवार गटाचे २ आमदार अब्जाधीश आहेत. 

आमदारांची एकूण संपत्ती किती?
राज्य    एकूण     एकूण     सरासरी 
    आमदार    संपत्ती    संपत्ती
कर्नाटक    २२३    १४१७९ कोटी    ६३ कोटी
महाराष्ट्र    २८६    १२४२४ कोटी    ४३ कोटी
आंध्र प्रदेश    १७४    ११३२३ कोटी    ६५ कोटी
तेलंगणा    ११९    ४६३७ कोटी    ३८ कोटी
उत्तर प्रदेश    ४०३    ३२४७    ८ कोटी
गुजरात    १८०    ३००९    १६ कोटी

पक्षनिहाय आमदारांची संपत्ती
पक्ष    आमदार        संपत्ती कोटींत
भाजप    १६५३        २६२७० 
काँग्रेस    ६४६        १७३५७
टीडीपी    १३४        ९१०८
अपक्ष    ६४        २३८८
शिवसेना    ५९        १७५८

राज्यनिहाय अब्जाधीश आमदार
३१ कर्नाटक
२७ आंध्र प्रदेश
१८ महाराष्ट्र
७ तेलंगणा
५ गुजरात
५ हरयाणा

राज्यनिहाय सर्वाधिक गुन्हे असलेले आमदार
राज्य    गुन्हे दाखल %
आंध्र प्रदेश       १३८     (१३८%)
केरळ              ९३     (५६%)
तेलंगणा            ८२    (६९%)
बिहार               १५८    (६६%)
महाराष्ट्र            १८७    (६५%)
तामिळनाडू        १३२    (१३२)

११९ (३%) आमदार हे अब्जाधीश आहेत.
७३,३४८ कोटी रुपये ४०९२ आमदारांची संपत्ती आहे. ही संपत्ती नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांच्या वर्षाच्या बजेटपेक्षा अधिक आहे.

पक्षनिहाय गुन्हे असलेले आमदार
पक्ष    गुन्हे असलेले आमदार    गुन्हे %
टीडीपी        १३४    ८६%
डीएमके      १३२    ७४%
सपा            ११०    ६२%
आप            १२३    ५६%
काँग्रेस         ६४६    ५२%
भाजप         १६५३    ३९%

१७.९२ कोटी रुपये आमदारांची सरासरी संपत्ती आहे.
४०० (१०%) महिला आमदार देशभरात आहेत.
६३ आमदारांनी आपला पक्ष बदलला आहे.
५४ आमदारांवर हत्येचे गुन्हे दाखल आहेत.
१२७ आमदारांवर महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
१३ आमदारांवर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.
४५% आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Wealth of MLAs in the country is 73,348 crores; Karnataka leaders are the richest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.