मुंबई : राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस), अटल पेन्शन योजना अशा पेन्शन योजनांखालील असलेली एकूण संपत्ती ४.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्च अखेरची ही स्थिती असून, या योजनेतील सहभागी झालेल्यांची संख्या ३.४५ कोटी एवढी आहे.पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणने (पीएफआरडीए) मार्च महिना अखेरीस असलेली आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार राष्ट्रीय पेन्शन योजनेत केंद्र सरकारचे २१.२० लाख तर राज्य सरकारांचे ४७.५४ लाख कर्मचारी हे सभासद झालेले आहेत. या योजनेतील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा हिस्सा १.३८ लाख कोटी रुपये, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हिस्सा २.११ लाख कोटी रुपये इतका आहे. केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी या योजनेत दरमहा रक्कम भरत असतात.सरकारी कर्मचाºयांशिवाय अन्य नागरिकही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. अशा एकूण २२.२६ लाख नागरिकांनी या योजनेत सहभाग नोंदविलेला आहे. यामध्ये १२.५२ लाख लोक हे वैयक्तिकरीत्या सहभागी झाले आहेत, तर ७५७१ उद्योगांमधील ७.७४ लाख कर्मचारी या योजनेमध्ये सहभागी झाले आहेत.आर्थिक वर्ष २०१९-२० या वर्षात एनपीएसमध्ये ५.४ लाख नवीन खातेदार सामील झाले आहेत. तसेच १६१७ नवीन उद्योगांनीही यामध्ये नव्याने नोंदणी केली असल्याचे पीएफआरडीएने जाहीर केले आहे.गत आर्थिक वर्षात एनपीएसमध्ये सहभागी झालेल्या खातेदारांची संख्या मागील वर्षापेक्षा ४३ टक्क्यांनी वाढली आहे. अटल पेन्शन योजनेखाली एकूण २.११ कोटी खातेधारकांची १०,५२७ कोटी रुपयांची रक्कम जमा आहे.- सुप्रतिम बंडोपाध्याय,अध्यक्ष, पीएफआरडीए
पेन्शन योजनांमधील संपत्ती ४.१७ लाख कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 1:09 AM