महिला सरपंचाने जमवली ११ कोटी रुपयांची संपत्ती; आलिशान बंगला, कोट्यवधींची वाहने, जमीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 07:21 AM2021-09-02T07:21:46+5:302021-09-02T07:22:02+5:30
आलिशान बंगला, कोट्यवधींची वाहने, दागिने, जमीन
भोपाळ (मध्य प्रदेश) : रिवा जिल्ह्यातील बैजनाथ गावच्या महिला सरपंच सुधा सिंह यांच्या दोन ठिकाणच्या घरी लोकायुक्तांनी मारलेल्या छाप्यांत ११ कोटी रुपयांची संपत्ती हाती लागली. सुधा सिंह यांच्या या संपत्तीत आलिशान बंगला, कोट्यवधी रुपयांची वाहने, सोन्या-चांदीचे दागिने, जमीन, विमा पॉलिसी, क्रशर, जेसीबी, चेन माउंटेनसारखे यंत्र आहे.
सुधा सिंह यांनी एक एकरवर बांधलेल्या बंगल्यात पोहण्याचा तलाव आहे. आतापर्यंत दोन डझनपेक्षा जास्त जमिनींची रजिस्ट्री, अनेक वाहने, आलिशान बंगला, क्रशर, सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त केली गेली आहे. सुधा सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार मिळाल्यानंतर लोकायुक्तांनी न्यायालयाकडून सर्च वाॅरंट घेतले. कारवाई सुरू असल्यामुळे अशी संपत्ती वाढण्याची शक्यता आहे.
लोकायुक्तांनी बैजनाथ गाव आणि शारदापूरम कॉलनीत एकाच वेळी छापा घातला. आतापर्यंत दोन निवासस्थाने (किमत दोन आणि १.५ कोटी रुपये) २ क्रशर मशीन, १ मिक्सर मशीन, एक ब्रिक मशीन, ३० मोठी वाहने हाती लागली आहेत. त्यात चेन माउंट, जेसीबी, हायवा, लोडर, ट्रॅक्टर, इनोव्हा, स्कॉर्पियोसारख्या वाहनांचा समावेश आहे.