कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील भाजपा खासदार एस मुनीस्वामी यांनी महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. एका महिला विक्रेत्यावर ओरडल्यामुळे ते चर्चेत आले आहे. महिलेला टिकली लावण्यास सांगणाऱ्या त्यांच्या वक्तव्यावर अनेक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
भाजपा खासदार महिला दिनानिमित्त आयोजित प्रदर्शन आणि विक्री मेळ्याला उपस्थित होते, ज्याचे उद्घाटन त्यांनी बुधवारी केले. कपडे विक्रीसाठी ठेवलेल्या स्टॉलवर आमदार थांबले आणि त्याचवेळी एका महिलेला टिकली न लावल्याबद्दल खडसावले.
कोलार येथील भाजपाचे खासदार म्हणाले, 'आधी एक टिकली लाव, तुझा नवरा जिवंत आहे ना? तुम्हाला कॉमन सेन्स नाही.या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
विरोधी पक्ष काँग्रेसने या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षाने मुनीस्वामी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि अशा घटना भाजपाच्या संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शवतात असं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"