शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

'मुस्लिम महिलांनी परपुरुषाच्या हातून बांगड्या भरुन घेणे हराम'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 11:37 AM

मुस्लिम महिला बाजारात जाऊन किंवा अन्य कुठे परपुरुषांच्या हातून बांगड्या भरुन घेतात हे शरियतच्या विरोधात आहे

सहारनपूर - उत्तर प्रदेशच्या दारुल उलूम देवबंदने अजून एक आश्चर्यकारक फतवा जारी केला आहे. या फतव्यात देवबंदने सांगितलं आहे की, मुस्लिम महिला बाजारात जाऊन किंवा अन्य कुठे परपुरुषांच्या हातून बांगड्या भरुन घेतात हे शरियतच्या विरोधात आहे. देवबंदचे मुफ्ती तारिक कासमी यांनी फतवा जारी करताना म्हटलं आहे की, 'एखाद्या पुरुषाने अनोळखी महिलेला भांगडी भरणं बेकायदेशीर आणि गुन्हा आहे. ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही अशा पुरुषांच्या हातून भांगडी भरुण घेणा-या महिलांना समाजातून बहिष्कृत केलं गेलं पाहिजे'.

देवबंदच्या अहमद गौड यांनीच दारुल उलूमला लिखीत प्रश्न विचारला होता की, 'आपल्या येथे साधारणपणे बांगड्या विकण्याचं आणि भरण्याचं काम पुरुषच करतात. महिलांना बांगड्या भरुन घेण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि आपला हात परपुरुषाच्या हातात द्यावा लागतो. अशाप्रकारे घरातून बाहेर पडून किंवा घरातच परपुरुषाच्या हातून बांगडी भरणं योग्य आहे का ?'

या प्रश्नाला उत्तर देताना देवबंदमधील मुफ्तींनी सांगितलं आहे की, 'पुरुषाने अनोळखी महिलेला भांगडी भरणं बेकायदेशीर आणि गुन्हा आहे'. 'ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही अशा पुरुषांच्या हातून बांगडी भरुन घेण्यासाठी महिलांनी घराबाहेर पडणं अमान्य आहे', असं देवबंदचे मुफ्ती तारिक कासमी बोलले आहेत. फतव्यात हा गुन्हा असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

बांगड्या भरणं चुकीचं नसल्याचं फतव्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र त्या परपुरुषाच्या हातून भरुन घेतल्या जाऊ नयेत. मुस्लिम महिलांनी बाजारातून बांगड्या मागवून घ्याव्यात आणि स्वत:च त्या भरुन घ्याव्यात असं फतव्यातून सांगण्यात आलं आहे.  

टॅग्स :Muslimमुस्लीम