Weather Update: पृथ्वीवरील हवामान बदलामुळे मागील काही वर्षात गरमी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यंदाही देशातील अनेक राज्यात भीषण उन्हाळा जाणवतोय. यातच आता पुढील 4 दिवस संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्यानुसार, शुक्रवारी राजधानी दिल्लीत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज असून कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
IMD ने जारी केला ऑरेंज अलर्ट IMD ने आधीच शुक्रवारच्या अंदाजासह ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार, शुक्रवारी दिल्लीतील किमान तापमान 25.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी जास्त होते. IMD ने सकाळी 8.30 वाजता जारी केलेल्या बुलेटिननुसार, 'पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, जम्मू, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, आणि झारखंडच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि ओडिशाच्या पश्चिमवरही याचा परिणाम दिसून येईल.
अनेक भागात 'लू'हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजता हवेतील आर्द्रतेची पातळी 28 टक्के होती. IMD च्या मते, जेव्हा मैदानी भागात तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा 4.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते तेव्हा उष्ण वारे 'लू' म्हणून घोषित केले जातात. जेव्हा तापमान सामान्यपेक्षा 6.4 अंश जास्त असते तेव्हा 'तीव्र उष्णतेची लाट' घोषित केली जाते.
उन्हाळ्याने 12 वर्षांचा विक्रम मोडलादिल्लीत गुरुवारी 12 वर्षातील एप्रिलचा सर्वात उष्ण दिवस 43.5 अंश सेल्सिअस तापमानासह नोंदवला गेला. 18 एप्रिल 2010 रोजी राष्ट्रीय राजधानीत कमाल तापमान 43.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आर.के. जेनामनी यांनी सांगितले की, 25 फेब्रुवारीनंतर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतीय मैदानी भागात लक्षणीय पाऊस झालेला नाही. पण, पश्चिम विक्षोभामुळे 2 मे रोजी दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.