शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

बापरे! डीजेवरून वाद पेटला, भर मंडपात तुफान राडा झाला; एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, Video व्हायरल    

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 12:56 PM

Crime News : एका लग्नात डीजेवरून दोन्हीकडची मंडळी भिडल्याचे पाहायला मिळाले. एकमेकांना थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. 

नवी दिल्ली - सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. लग्न म्हटलं की भन्नाट किस्से हे आलेच. सोशल मीडियावर विविध हटके व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका लग्नात डीजेवरून दोन्हीकडची मंडळी भिडल्याचे पाहायला मिळाले. लग्नमंडपातच आधी वाद झाला आणि पुढे तुफान राडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात डीजेवर डान्स करताना काही मुलं आपापसात भिडली. त्यांनी एकमेकांना थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. 

मुलं एवढ्यावरच थांबली नाहीत तर मंडपातील खुर्च्या देखील एकमेकांवर फेकल्या. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी या घटनेचा एक व्हिडीओ तयार केला आणि आता तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मुरादाबादच्या करुला जाहिद नगरमध्ये एका लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण याच वेळी डीजेवरून वर आणि वधुकडील मंडळींमध्ये वाद झाला. पुढे या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओची पोलिसांनी गंभीरतेने दखल घेऊन योग्य ती कारवाई सुरू केली आहे. वादामागचं नेमकं कारण काय याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. ऐन लग्नाच्या वेळी ही घटना घडल्याने मंडपात एकच गोंधळ उडाला. नातेवाईकांना देखील धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी