शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हृदयद्रावक! लेकाच्या लग्नात डीजेवर नाचताना आईचा मृत्यू; नवरदेवाच्या कुशीतच सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 10:59 AM

ज्या घरातून मुलाची वरात निघणार होती. त्याच घरातून आईची अंत्ययात्रा निघाल्याची हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - राजस्थानच्या अलवरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. ज्या घरातून मुलाची वरात निघणार होती. त्याच घरातून आईची अंत्ययात्रा निघाल्याची हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. आपल्या मुलाच्या लग्नात डीजेवर डान्स करताना त्याच्या आईचा दुर्देवी मृत्यू झाला. नवरदेवदेखील आईसोबत डान्स करीत होता. तितक्यात आई खाली पडते. नवरदेवाने लगेच खाली पडलेल्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आईने नवरदेवाच्या कुशीत जीव सोडला. ही संपूर्ण घटना तेथील एका तरुणाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

3 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलवरच्या चिकानीमध्ये सतीश आणि निलम यांचा मुलगा नीरज याचं लग्न होतं. किशनगडपासून बंबोरा येथे वरात जाणार होती. 4 फेब्रुवारी रोजी सप्तपदी होणार होत्या. 55 वर्षीय आई निलम यांची तब्येत 3 फेब्रुवारी रोजी लग्नापूर्वीच्या विधीत चांगली होती. यानंतर रात्री डीजेवर डान्स सुरू होता. याच दरम्यान नातेवाईकांनी निलमलाही डान्स करण्याचा आग्रह केला. त्या डान्स करता करता अचानक खाली कोसळल्या. मुलाने तातडीने आईला सांभाळलं आणि तिला रुग्णालयात घेऊन गेला. येथे डॉक्टरांनी निलम यांना मृत घोषित केलं.

अवघ्या 20 सेकंदात मृत्यू

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, निलम यांनी सेकंदापूर्वीच डान्स सुरू केला होता. मुलगा नीरजदेखील आईसोबत डान्स करीत होता. इतक्यात नवरदेवाची आई डान्स करता करता खाली कोसळली. यादरम्यान त्यांचा हार्ट फेल झाल्याचं सांगितलं जात आहे. अवघ्या 20 सेकंदात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलाने आधी आईवर अंत्यसंस्कार केले. डोळ्यातील अश्रू थांबले नसताना पुढील चार दिवसात तो वरात घेऊन लग्नासाठी पोहोचला. केवळ सप्तपदी झाले. 

स्थानिकांचं म्हणणं आहे की, जिल्ह्यात अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीच पाहायला घडली नाही. गावकऱ्यांनी सांगितलं की, महिलेला आधीपासून हृदयाचा त्रास होता. यामुळे तिची औषधं देखील सुरू होती. याकारणामुळे डान्स करीत असताना त्यांचं हृदय बंद पडल्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यात लग्न समारंभांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तब्बल 2 महिन्यांपूर्वी राजसमंद गावातील नवरदेवाच्या छोट्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानmarriageलग्न