वहनोत्सवाची सवाद्य मिरवणूक
By admin | Published: November 02, 2016 12:44 AM
रात्री ८ वाजता वहन मिरवणुकीस प्रारंभ झाला. वहनाच्या पुढे सनई, गुरव, वांजती पथक, बॅँड पथक, झेंडेकरी भजनी मंडळ, संत मुक्ताईच्या पादुकांची पालखी व त्यामागे वहन असा ताफा होता. भोईटे, गढी, कोल्हेवाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, रथ चौक मार्गे सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी देवस्थानतर्फे पान सुपारीचा कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी भजन व भारूडाचा कार्यक्रम झाला. मंदिराचे पूजारी महेश त्रिपाठी यांच्या हस्ते वहनाची आरती झाली. यानंतर सुभाष चौकात सुभाष चौक पतसंस्थेतर्फे पानसुपारीचा कार्यक्रम झाला. आदित्य खटोड यांच्या हस्ते पूजा झाली. श्रीकांत खटोड, मनिष अग्रवाल, सौरभ नवगाळे, संजय गांधी आदी उपस्थित होते.
रात्री ८ वाजता वहन मिरवणुकीस प्रारंभ झाला. वहनाच्या पुढे सनई, गुरव, वांजती पथक, बॅँड पथक, झेंडेकरी भजनी मंडळ, संत मुक्ताईच्या पादुकांची पालखी व त्यामागे वहन असा ताफा होता. भोईटे, गढी, कोल्हेवाडा, आंबेडकर नगर, चौधरी वाडा, तेली चौक, रथ चौक मार्गे सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी देवस्थानतर्फे पान सुपारीचा कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी भजन व भारूडाचा कार्यक्रम झाला. मंदिराचे पूजारी महेश त्रिपाठी यांच्या हस्ते वहनाची आरती झाली. यानंतर सुभाष चौकात सुभाष चौक पतसंस्थेतर्फे पानसुपारीचा कार्यक्रम झाला. आदित्य खटोड यांच्या हस्ते पूजा झाली. श्रीकांत खटोड, मनिष अग्रवाल, सौरभ नवगाळे, संजय गांधी आदी उपस्थित होते. यांनी घेतले परिश्रमवहनोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विकास चौधरी, राजु काळे, अरूण मराठे, मुकुंद धर्माधिकारी, नंदु शुक्ल, सुनील चौधरी, देवेश पाठक, भानुदास चौधरी, कालिदास खडके, दिलीप खडके, खंडू तांबट, जितेंद्र वाळके, दिलीप कोळी, मंगेश डांबरे यांच्यासह अन्य सेवेकर्यांनी सेवा दिली.