शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

महागाईने बिघडवले बँडबाजा-बारातचे बजेट; लग्नाच्या हंगामाला सुरुवात, देशभरात ४० लाख लग्नांचा बार उडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 2:22 PM

यंदा वर आणि वधू या दोन्ही पक्षांवर महागाईचा मार बसण्याची शक्यता आहे. महागाईमुळे लग्नासाठी येणाऱ्या खर्चात जवळपास ३० टक्क्यांची मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली : देशात सध्या लग्नांचा हंगाम सुरू झाला असून, तो ९ जुलैपर्यंत चालू राहणार आहे. कोरोनापासून दिलासा मिळाल्यानंतर आता मोठ्या संख्येने लग्नांचा बार उडण्याची शक्यता आहे. ही संख्या ४० लाखांपेक्षा अधिक असून, यामुळे ५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यक्त केली आहे.

यंदा वर आणि वधू या दोन्ही पक्षांवर महागाईचा मार बसण्याची शक्यता आहे. महागाईमुळे लग्नासाठी येणाऱ्या खर्चात जवळपास ३० टक्क्यांची मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. हॉल, केटरिंग, डेकोरेशन, वाहतूक, फुले, दागिने, कपडे महाग झाल्याने लग्नांमध्ये वधू आणि वर पक्षांचे खिसे बऱ्यापैकी रिकामे होणार आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. खुर्ची, स्टेज, तंबू यासह अनेक वस्तूंच्या भाड्यांमध्ये १० टक्केपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

चंदेरी साडीचा व्यवसाय चमकला- राजघराण्यातील महिलांची शोभा वाढवणाऱ्या चंदेरी साडीचा व्यवसाय कोरोनानंतर वाढीस लागला आहे. - कोरोना रुग्णांची कमी होत असलेली संख्या आणि लग्नांचा हंगाम सुरू झाल्यामुळे यावर्षी चंदेरी साडीचा व्यवसाय चमकला आहे. - यावर्षी लग्न हंगाम आणि मुहूर्त अधिक असल्याने चंदेरी साडीच्या विक्रीत दुप्पट वाढ होण्याचा अंदाज आहे.

बँडबाजाही झाला अधिक महागगेल्यावर्षी ५०० रुपये प्लेटने मिळत असलेले जेवण यावेळी ८०० रुपये प्लेटवर पोहोचले आहे. बँड पार्टीसाठी ४० हजारांवर पैसे द्यावे लागत आहेत. मिठाई, भाज्या, अन्नधान्य महाग झाल्याने लग्नाचा खर्च आणखी वाढणार आहे.

खिसा होणार अधिक रिकामा- ५०% वाढली रेशमची किंमत. यामुळे लग्नातील चंदेरी साडीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

- ५3 हजारांवर गेली आहे सोन्याची किंमत. यामुळे सोने-चांदीचे दागिने घेणे अधिक महाग झाले आहे.

- २५० कोटी व्यवसाय चंदेरी साडीमधून यंदा होण्याची शक्यता

- २०० कोटी चंदेरी साडी, सूट, कुर्ते कोरोनापूर्वी लग्न हंगामात विकले जात. 

टॅग्स :marriageलग्नInflationमहागाई