लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काेराेनाचा दिल्लीत प्रकाेप वाढला असून गेल्या ८ दिवसांत ११ हजार काेराेनाबाधित आढळल्यानंतर दिल्ली सरकारने विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्यानुसार शनिवार व रविवारी शहरात संपूर्ण लाॅकडाऊन असेल.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून काेराेनाचे रुग्ण माेठ्या प्रमाणात शहरात दिसून येत आहे. दिल्लीतील संक्रमण दर साडेसहा टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. मंगळवारी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (डीडीएमए) बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बाेलताना उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया म्हणाले, “सलग दाेन दिवसांपासून संक्रमण दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे शहरातील काेराेना निर्बंध अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. दिल्ली शहर ‘ग्रेप’ मानकांनुसार आता रेड झाेनमध्ये आलेले आहे.
मेट्राे व डीटीसी बसमध्ये पूर्ण आसनक्षमतेने प्रवासी प्रवास करून शकतील. याआधीच ही क्षमता केवळ ५० टक्के केली हाेती.
खासगी संस्थांमध्ये ५० टक्के उपस्थितीनव्या निर्बंधानुसार दिल्लीत शनिवार व रविवारी संपूर्ण लाॅकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी वगळून दिल्लीतील शासकीय कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा आहे. राजधानीतील खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के राहील, असे सिसाेदिया म्हणाले.