गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी आपापल्या पातळीवर निर्बंधांची घोषणा केली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध घातले आहेत. तर दुसरीकडे अन्य राज्यांमध्येही काही निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्लीतही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिल्लीत वीकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत आज घोषणा केली. वीकेंज कर्फ्यू हा शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली. वीकेंड कर्फ्यूदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसंच ज्यांच्या लग्नाच्या तारखा यादरम्यान निश्चित आहेत त्यांना पास दिले जातील. याशिवाय जिम, मॉल, स्पा, बाजार आणि अन्य ठिकाणं बंद ठेवण्यात येतील. याशिवाय चित्रपटगृहं ३० टक्के प्रमाणात सुरू राहिल, असं केजरीवाल यांनी नमूद केलं.
Coronavirus : दिल्लीतही कोरोनाचा हाहाकार, वीकेंड कर्फ्यूची केजरीवाल यांची घोषणा; जिम, मॉल्स बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 2:00 PM
दिल्लीतही या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. बेड्सची कमतरता नसल्याची केजरीवाल यांची माहिती.
ठळक मुद्देदिल्लीतही या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार.बेड्सची कमतरता नसल्याची केजरीवाल यांची माहिती.