नवी दिल्ली : दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी काल माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचं यमुना नदीत विसर्जन केलं. तिवारी यांनी अस्थी विसर्जनाचा फोटो ट्विट केला आहे. सध्या या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत तिवारी यांच्यासह भाजपाचे नेते बोटीवर दिसत आहेत.
मनोज तिवारी यांनी ट्विट केलेल्या फोटोत एक हात दिसतो आहे. बोटीतून बाहेर आलेला 'तो' हात नेमका कोणाचा याची चर्चा सध्या सोशल मीडियात सुरू आहे. तिवारी यांनी ट्विट केलेल्या फोटोत भाजपाचे काही नेते अस्थींचं विसर्जन करताना दिसत आहेत. तिवारी यांच्यासोबत असलेले एक नेते या फोटोत वाकून अस्थी विसर्जित करत आहेत. तर तिवारी यांच्यासह इतर सर्वांनी हात जोडले आहेत. मात्र यावेळी एक हात बोटीतून बाहेर आलेला दिसतो आहे. या हातानं पाण्याला स्पर्श केल्याचंही फोटोत दिसत आहे.
अस्थी विसर्जनावेळी बोटीतून बाहेर आलेला 'तो' हात नेमका कोणाचा, याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे तिवारी यांनी बोटीतील दोन फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यातील एका फोटोत तिवारी अस्थी कलश रिकामा करताना दिसत आहेत. या फोटोत 'तो' हात कुठेही दिसत नाहीत. मात्र अस्थी कलश रिकामी केल्यानंतरच्या फोटोत 'तो' हात अगदी स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आधी न दिसणारा 'तो' हात नंतर अचानक कुठून आला, याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.