ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारच्या सुटकेनंतर अनेक बड्या नेत्यांनी त्याला समर्थन दिले असून आता सत्ताधारी भाजपातील नेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही त्याच्या सुटकेचे स्वागत केले. खासदार सिन्हांनी कन्हैयाला समर्थन देत त्याच्या जामीनावर आपण खुश असल्याचेही नमूद केले.
'कन्हैया कुमारला मिळालेल्या (सशर्त) जामीनाबद्दल आणि त्याची तुरूगांतून सुटका झाल्यामुळे मी खुश आहे. मात्र त्याला (लोकांकडून) मिळालेला पाठिंबा व समर्थन तो सार्थ ठरवेल आणि विरोधकांना योग्य उत्तर देईल अशी मला आशा आहे' असे ट्विट सिन्हा यांनी केले.
शत्रुघ्न सिन्हा यांनी आजवर अनेकवेळा पक्षाबाबतची नाराजी उघडपणे व्यक्त करत पक्षविरोधी वक्तव्येही केली आहेत. आजही त्यांनी सरकारविरोधात बोलत कन्हैयाला पाठिंबा दर्शवला आहे.
देशद्रोहाच्या आरोपाखाली १२ फेब्रुवारी रोजी अटक झाल्यापासून कन्हैया कुमार तिहार कारागृहात होता. गुरूवार, ३ मार्च रोजी त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. दरम्यान काल दिलेल्या भाषणादरम्यान त्याने ' माझा आदर्श नव्हे संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरू नव्हे तर रोहित वेमुला असल्याचे स्पष्ट केले होते.
<1/2>Happy about the grant of bail (although conditional) by the honourable court to Kanhaiya & pleased that he's been released from prison.— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) March 4, 2016
<2/2>..Hope, wish and pray that he will prove himself worthy of the support that he received from everyone who felt that he was wronged.— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) March 4, 2016