पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात काल रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन जारी केले. पंतप्रधान मोदींनी अर्ध्या तासाच्या भाषणानंतर किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तूंविषयी अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांनी किराणा दुकानात एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली. मात्र, पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे ट्विटरला शेअर केलेले डिलेव्हरी बॉयचे फोटो पाहून तुम्ही सुद्धा अवाक व्हाल.
किराणा, खाद्यपदार्थ, औषधे इत्यादी सर्व आवश्यक वस्तू जनतेसाठी खुल्या राहतील आणि आजपासून २१ दिवस लॉकडाऊन चालू असताना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू शकणार नाही याची सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली. फूड ऑर्डर आणि आवश्यक वस्तूंच्या वितरण सेवा खुल्या आहेत आणि बरेचजण बाहेर पडणे टाळण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर देत आहेत.लोकांनी घराबाहेर न पडण्याचे कडक आदेश दिले असतानाही, अत्यावश्यक वस्तूंची डिलिव्हरी करणारे देखील डॉक्टर, परिचारिका आणि स्वच्छता कामगारांप्रमाणेच आपले जीवन सुकर बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, दिल्ली आणि मुंबईसारख्या ठिकाणी पोलिसांकडून डिलिव्हरी करणाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. एका ट्विटर युझरने आवश्यक ते अन्न आणि औषधे देणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी ट्विटरवर जाऊन पोलिसांच्या या भयंकर कृत्यावर टीका केली आहे.एका ट्विटर युझरने लिहिले की, “मिल्कबास्केट अॅपने प्रशासन त्रास देत आहेत म्हणूनच ते वितरित करण्यात अक्षम आहेत अशी माहिती दिली आहे.