मोदींना लोकशाहीचे धडे द्यायला गेले आणि कपिल सिब्बल स्वत: ट्रोल झाले, वाचा नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 03:15 PM2021-09-26T15:15:03+5:302021-09-26T15:16:00+5:30

Kapil Sibal News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये केलेल्या भाषणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उपहासात्मक टीका केली होती. मात्र ही टीका कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्यावरच उलटली

went to teach democracy lessons to Modi and Kapil Sibal became a troll | मोदींना लोकशाहीचे धडे द्यायला गेले आणि कपिल सिब्बल स्वत: ट्रोल झाले, वाचा नेमकं काय घडलं?

मोदींना लोकशाहीचे धडे द्यायला गेले आणि कपिल सिब्बल स्वत: ट्रोल झाले, वाचा नेमकं काय घडलं?

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये केलेल्या भाषणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उपहासात्मक टीका केली होती. मात्र ही टीका कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्यावरच उलटली असून, ट्विटर युझर्सनी त्यांचीच हजेरी घेण्यास सुरुवात केली. कपिल सिब्बल यांनी लोकशाहीवर ज्ञान देणे ट्विटरवरील युझर्सना फारसे रुचले नाही. त्यांनी काँग्रेसलाच उलट आरसा दाखवण्यास सुरुवात केली. (went to teach democracy lessons to Modi and Kapil Sibal became a troll)

सिब्बल म्हणाले होते की, संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा जगातील सर्वं लोकशाहींची जननी असा उल्लेख केला. आता योगी आणि हिमंता बिस्व शर्मा यांनी मोदींचे हे बोल ऐकले असतील, अशी अपेक्षा आहे. कपिल सिब्बल यांनी या माध्यमातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांच्या लोकशाहीबाबतच्या कटिबद्धतेवर शंका उपस्थित केली. भाजपाचे हे दोन्ही मुख्यमंत्री फायरब्रँड म्हणून ओळखले जातात. तसेच हिंदुत्वाच्या राजकारणाचे ते चर्चित चेहरेही आहे. त्यातील हिमंता बिस्व शर्मा हे तर आधी काँग्रेसचमध्येच होते. दरम्यान, नेटिझन्सना कपिल सिब्बल यांची ही टिप्पणी रुचली नाही. ते त्यांना ट्रोल करू लागले. 

सुमन मंडल नावाच्या एका ट्विटर युझरने लिहिले की, कपिल सिब्बल जी, तुम्ही आणि तुमचे जी-२३ मधील सहकारी लवकरच काँग्रेसमध्ये लोकशाही स्थापित करण्यामध्ये आणि मेरिटोक्रसीला प्रमोट करण्यामध्ये लवकरच सक्षम व्हाल अशी मी अपेक्षा करते. 



राजेश जोशी नावाच्या एका युझरने सिब्बल यांच्यावरच प्रश्न उपस्थित करत लिहिले की, तुम्ही त्या पार्टीशी संबंधित आहात ज्यांनी देशामध्ये आणीबाणी लादली होती आणि लोकशाहीचा गळा आवळला होता. आज कुणीही काहीही बोलतो की लोकशाही नाही आहे. 


रघू नावाचा्या एका युझरने विचारले की, बंगाल, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान आणि पंजाबमध्ये लोकशाही आहे का? बंगालमध्ये आतापर्यंतचा सर्वात वाईट अशा निवडणुकोत्तर हिंसाचार झाला आणि काँग्रेसने यावर एक ब्र सुद्धा काढला नाही.

Web Title: went to teach democracy lessons to Modi and Kapil Sibal became a troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.