गुजरातच्या वडोदरा शहरात गुरुवारी सकाळी भीषण दुर्घटन घडली. येथे माता दशामाची मूर्ती विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांपैकी ५ जण नदीत बुडाले. त्यापैकीस दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. येथील महिसागर नदीत ही दुर्घटना घडली. स्थानिकांच्या मदतीसह फायर ब्रिगेड आणि आपत्ती बचाव पथकानेही नदीत बुडालेल्या मुलांसाठी शोधमोहिम सुरू केली आहे. पावसाळा असल्याने नदीला पाणी आले असून प्रवाहही वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे, बुडालेली मुले दूरपर्यंत गेली असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वडोदराच्या किशनवाडी परिसरात राहणाऱ्या प्रज्ञेश माछी ( २३) यांच्या घरी दशमा मातेची प्रतिष्ठापण केली होती. त्यानंतर, गुरुवारी सकाळी ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत परिसरातील आणि भाविक सहभागी झाली होते. येथील महिसागर नदीत मूर्तीचे विसर्जन करण्यात येत असताना मिरवणुकीतील सहभागी भाविकांपैकी ५ जण नदीत बुडाले. या मिरवणुकीत ४० ते ५० लोक सहभागी झाले होते.
मूर्ती विसर्जन करताना प्रज्ञेश माछी उफनती नदीत बुडताना त्याच्या मित्राने पाहिले. प्रज्ञेश बुडत असल्याने त्याचा मित्र सागर याने नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याच प्रवाह गतीमान असल्याने सागरही नदीत वाहून गेला. डोळ्यादेखत काही क्षणात दोन्ही युवक नदीत वाहून गेले. त्यानंतर, तेथील स्थानिक युवकांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यानंतर, फायर ब्रिगेड आणि स्थानिक प्रशासनाला माहिती देताच, ते घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोन्ही युवकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, महिसागर नदीतच आणखी ३ युवक बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. सावली तालुक्यातील कनोडा गावात ही दुर्घटना घडली. येथेही दशमा देवीमाताच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ६० ते ७० भाविक आले होते. त्यावेळी, मूर्ती विसर्जनानंतर संजय गोहिल (३२), कौशिक अरविंदभाई गोहिल (२०) आणि विशाल रतिलाल गोहिल (१५) हे नदीत अंघोळीसाठी उतरले होते. पाण्याचा प्रवाह गतीमान असल्याने ते नदीच्या पाण्यात वाहून गेले. हे तिन्ही मित्र एकमेकांचे मित्र होते. त्यापैकी एकाच मृतदेह काढण्यात आला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.