West assembly election 2021: बंगालमधील कांठी येथे शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर हल्ला, टीएमसी नेत्यावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 01:16 PM2021-03-27T13:16:00+5:302021-03-27T13:17:52+5:30
सौमेंदू यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. सुवेंदू अधिकारी यांचे भाऊ दिब्येंदू अधकारी यांनी आपल्या भावाच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासाठी टीएमसी नेत्यावर आरोप केला आहे. (West assembly election)
कोलकाता - नुकताच टीएमसी सोडून भाजपचा भगवा हाती घेतलेले शुभेंदू अधिकारी यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर कांठी यथे हल्ला झाला आहे. मात्र, यावेळी सौमेंदू कारमध्ये नव्हते. या हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. यानंतर या हल्ल्याचा आरोप टीएमसीवर करण्यात येत आहे. आज बंगालमधील 5 जिल्ह्यांत 30 विधानसभा जगांसाठी मतदान होत आहे. (West assembly election 2021 attack on suvendu adhikari brother soumendu adhikari bjp tmc)
तत्पूर्वी, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील गारघेटा विधानसभा मतदारसंघात सीपीएमचे उमेदवार सुशांत घोष यांच्यावरही हल्ल्याची घटना घडली होती. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी, मेदिनीपूर जिल्ह्यातील भगवानपूर विधानसभा मतदारसंघातील सतसतमल येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.
टीएमसी नेत्यावर आरोप -
सौमेंदू यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात कारचालक जखमी झाला आहे. सुवेंदू अधिकारी यांचे भाऊ दिब्येंदू अधकारी यांनी आपल्या भावाच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासाठी टीएमसी नेत्यावर आरोप केला आहे. ते म्हणाले, मला माहिती मिळाली आहे, की टीएमसीच्या ब्लॉक अध्यक्षाने सौमेंदू अधिकारी यांच्या कारवर हल्ला करवला. यात कारचालकालाही मारहाण करण्यात आली आहे. यात कारचालक जखमी झाला आहे. कारवर झालेल्या हल्ल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
I got to know that vehicle (of Soumendu Adhikari) was attacked in Contai with help of TMC block president Ram Govind Das. Soumendu isn't injured. Driver was beaten up. I've informed Police Observer: Dibyendu Adhikari, TMC leader & brother of Soumendu Adhikari#WestBengalPollspic.twitter.com/IDL4Wc6fKz
— ANI (@ANI) March 27, 2021
मतदानाच्या टक्केवारीसंदर्भात तृणमूल काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार -
टीएमसीने निवडणूक आयोगाकडे मतदानाच्या टक्केवारीत गडबड झाल्याचे म्हणत लेखी तक्रार केली आहे. तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे, की कांठी दक्षिण (216) आणि कांठी उत्तर (213) मतदान केंद्रांवर सकाळी 9.13 वाजता मतदानाची टक्केवारी प्रत्येकी 18.47% आणि 18.95% होती. मात्र, चार मिनिटांनंतर 9.17 वाजता ही टक्केवारी कमी होऊन 10.60% आणि 9:40 टक्क्यांवर आली आहे. ही गडबड आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला हवी. (West Bengal Election Voting)
धक्कादायक! कार्यकर्त्याचा मतदानादिवशीच आढळला मृतदेह; भाजपाने केला हत्येचा गंभीर आरोप
मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या 659 तुकड्या तैनात -
पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण 191 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 21 महिलादेखील आहेत. 2016 च्या विधानसभा निवडणुकांत या 30 जागांपैकी 27 ठिकाणी तृणमूलचे उमेदवार विजयी झाले होते. निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या 659 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.