कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शनिवारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ईडीने पुतण्या अभिषेक बॅनर्जीला जारी केलेल्या समनवरून ममता भडकल्या आहेत. आपण यांना घाबरणार नाही, असे ममतांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर तुम्ही आम्हाला ईडीची भीती दाखवली, तर आम्हीही भाजप नेत्यांच्या विरोधात केंद्रीय एजन्सींना पुरावे पाठवू, असेही ममतांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांनी आज टीएमसी विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त कालीघाट येथे संबोधित केले. यावेळी ममता यांनी भाजपवर निशाणा साधत, त्या म्हणाल्या, भाजप टीएमसी विरोधात सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. लोकांसाठी काम करणे ही आमची प्राथमिकता आहे. दिल्लीतील भाजप सरकार जेव्हा राजकारणात आमचा सामना करू शकत नाही, तेव्हा ते एजन्सीजचा वापर करतात. काही लोक आम्हाला सोडून गेले होते. परंतु आता ते परत आले आहेत, कारण त्यांना माहित आहे, की त्यांचे घर येथेच आहे(TMC).
Coal Scam Case : ममतांचं कुटुंब पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात, अभिषेक आणि त्यांच्या पत्नीला ED चं समन
ममता म्हणाल्या, तुम्ही आमच्या विरोधात ईडीचा वापर का करत आहात, तुमच्याशी कसे लढायचे हे आम्हाला माहीत आहे, आम्हाला गुजरातचा इतिहासही माहित आहे. तुमच्या एका प्रकरणाविरोधात, आम्ही बॅग भरून प्रकरणं काढू. कोळशाच्या भ्रष्टाचारासाठी तृणमूलकडे बोट दाखवून उपयोग नाही. हे केंद्रांतर्गत आहे. याच्या मंत्र्यांचे काय? त्या भाजप नेत्यांचे काय, ज्यांनी बंगाल, आसनसोल भागातील कोळशाचा बेल्ट लुटला, असे प्रश्नही ममतांनी यावेळी उपस्थित केले.
आता केवळ 71 दिवस! ममतांची खुर्ची वाचविण्यासाठी TMCनं पुन्हा ठोठावला निवडणूक आयोगाचा दरवाजाअभिषेक आणि त्यांच्या पत्नीला ED चं समन -अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजीरा बॅनर्जी यांना कोळसा तस्करी प्रकरणात समन बजावले आहे. याशिवाय बंगाल सीआयडीचे एडीजी ज्ञानवंत सिंग आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचे वकील संजय बसू यांनाही समन पाठवण्यात आले आहे. ईडीने टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांना 6 सप्टेंबरला, तर त्यांची पत्नी रुझीरा यांना 3 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.