West Bengal Election 2021: पश्चिम बंगालमध्ये ५ व्या टप्प्यात ७८.३६ टक्के मतदान; काही ठिकाणी हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 08:13 PM2021-04-17T20:13:53+5:302021-04-17T20:18:24+5:30

west bengal assembly election 2021: पाचव्या टप्प्यातही मतदारांचा उत्साह दिसून आला.

west bengal assembly election 2021 78 percent voter turnout recorded till 5 pm | West Bengal Election 2021: पश्चिम बंगालमध्ये ५ व्या टप्प्यात ७८.३६ टक्के मतदान; काही ठिकाणी हिंसाचार

West Bengal Election 2021: पश्चिम बंगालमध्ये ५ व्या टप्प्यात ७८.३६ टक्के मतदान; काही ठिकाणी हिंसाचार

googlenewsNext
ठळक मुद्देसायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ७६. ३६ टक्के मतदानबंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनापाचव्या टप्प्यासाठी सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (शनिवारी) मतदान पार पडले. बंगालमधील २९४ जागांपैंकी एकूण १३५ जागांवर चार टप्प्यात मतदान यापूर्वी पार पडले असून, अद्याप १५९ जागांवर मतदान बाकी आहे. पाचव्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ७६. ३६ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या दिवशीही हिंसाचाराच्या घटल्याची माहिती मिळाली आहे. (west bengal assembly election 2021 78 percent voter turnout recorded till 5 pm)

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत पार पडलेल्या चारही टप्प्यांमध्ये हिंसाचार घडला. त्यामुळे निवडणूक आयोगाने पाचव्या टप्प्यात सुरक्षा आणखीन वाढवली आहे. या टप्प्यात केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच चारही टप्प्यांत मतदानही भरघोस झाल्याचे पाहायला मिळाले असून, पाचव्या टप्प्यातही मतदारांचा उत्साह दिसून आला. पाचव्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ७६. ३६ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी; राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना

बिधाननगर येथील शांतिनगर भागात तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये झटापट झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेकीत आठ जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तर, उत्तर २४ परगनाच्या कामरहाटी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजू बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

कामरहाटी मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १०७ वर भाजप कार्यकर्ता अभिजीत सामंत यांची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पश्चिम बंगामध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरलेले पाच उमेदवारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील तीन जण तृणमूल काँग्रेसचा, एक रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) तर एक जण भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे. 

“उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”; केंद्रीय मंत्र्यांची टीका

बंगालमध्ये ४२० टक्के कोरोना रुग्णवाढ

पाच राज्यांतील निवडणुकांपैकी सर्वाधिक चर्चा आहे, ती पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेकांनी बंगालमध्ये तळ ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत कोरोना संसर्गालाही मोठा जोर आल्याचे चित्र आहे. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत बंगालमध्ये ८ हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत बंगालमध्ये ४१ हजार ९२७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, १२७ जणांचा मृत्यू झाला आहे.  
 

Web Title: west bengal assembly election 2021 78 percent voter turnout recorded till 5 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.